शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

साखरपुड्यासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, एक ठार; नवरदेवासह सहा जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 15:38 IST

दापोली : साखरपुड्यासाठी नवरदेवासह कुटुंबिय नवरीच्या गावी निघाले असता, घरापासून काही अंतरावरच झालेल्या अपघातात एक ठार तर नवरदेवासह सहा ...

दापोली : साखरपुड्यासाठी नवरदेवासह कुटुंबिय नवरीच्या गावी निघाले असता, घरापासून काही अंतरावरच झालेल्या अपघातात एक ठार तर नवरदेवासह सहा जण जखमी झाले. दीपक कदम (वय-५५,  पालवणी, सध्या रा. मुंबई) असे मृताचे नाव आहे. जखमीमधील तिघांची प्रकृती गंभीर आहे. कुंभवे मराठी शाळेजवळ गतिरोधकावर आदळल्याने कारचा अपघात झाला. हा अपघात आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास झाला.मिळालेल्या माहितीनुसार, कुंभवे शिगवण वाडीतील तुषार डिके यांचे लग्न मंडणगड तालुक्यातील पालवणी गावातील मुलीशी ठरले होते. आज, त्यांचा साखरपुडा होता. तर २४ तारखेला लग्न होते. या साखरपुड्यासाठी तुषारचे मित्र गाडी घेऊन मुंबईतून आले होते. दीपक कदम यांची फॅमिली आजच मुंबईतून कुंभवे येथे दाखल झाले होते.ही सर्व मंडळी एकत्रितपणे साखरपुड्यासाठी मंडणगड तालुक्यातील पालवणी गावाला जायला निघाली होती. कारमध्ये नवरदेवा सह इतर नातेवाईक मंडळी बसली होती. परंतू घरापासून अवघ्या दोनशे मीटरवर अपघात होऊन सर्वावर दुःखाचा डोंगर कोसळला.नवरदेवच कार चालवत असल्याची चर्चानवरदेव तुषार डिके हाच कार चालवत असल्याची चर्चा असून या गाडीत क्षमतेपेक्षा जास्त लोक बसली असल्याची चर्चा होती. गावातील स्पीड ब्रेकरवर गाडी आदळल्याने गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज आहे. अपघाताचा मोठा आवाज झाला आणि आजूबाजूचे शेजारी धावून आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात