फेसबुकवरुन अश्लील संदेश पाठवणारा ताब्यात
By Admin | Updated: July 9, 2014 23:58 IST2014-07-09T23:39:41+5:302014-07-09T23:58:59+5:30
रत्नागिरीतून आरोपी ताब्यात

फेसबुकवरुन अश्लील संदेश पाठवणारा ताब्यात
चिपळूण : शहरातील एका विवाहितेला फेसबुकच्या माध्यमातून अश्लील संदेश तसेच अश्लील फोटो पाठवून तिच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केल्याने कुवारबाव (ता. रत्नागिरी) येथील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चिपळूण येथील विवाहितेने तक्रार दिल्यानुसार दि. २५ जून २०१४ ते ९ जुलै २०१४ या कालावधीत फेसबुक या सोशल साईटवर इंटरनेटच्या माध्यमातून संशयित आरोपी अर्जुन पाटील (सध्या रा. कुवारबाव, रत्नागिरी) यांनी फिर्यादी यांच्या फेसबुक अकाऊंटवर ‘यश मराठे’ व ‘राज रत्नागिरीचा’ या आरोपीच्या फेसबुक अकाऊंटवरील नावाने अश्लील एसएमएसद्वारे संभाषण केले. तसेच अश्लील फोटो पाठवून फिर्यादीच्या मनास लज्जा निर्माण केली. याप्रकरणी आज (बुधवारी) चिपळूण पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००५ चे कलम ६६ व भादंवि कलम ३५४ (ड), ५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे करीत आहेत. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती. (प्रतिनिधी)