शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गुहागरमध्ये शिवसैनिकच निवडणूक लढवेल, उमेदवारीबाबतच्या चर्चांचे मंत्री उदय सामंतांकडून खंडन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 16:28 IST

..तर रामदास कदमांचा गैरसमज दूर झाला असता

चिपळूण : गुहागर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटातून शिवसैनिकच विधानसभेची निवडणूक लढवेल. या मतदारसंघासाठी अद्याप कोणाचीही उमेदवारी निश्चित झालेली नाही. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मेहुण्याने फलक लावला, म्हणजे त्यांनाच उमेदवारी दिली, असे होत नाही, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते मंगळवारी येथील प्रांत कार्यालयाचे भूमिपूजन झाले. त्यानंतर शिक्षक बँकेतील आयोजित कार्यक्रमात बचत गटाच्या सीआरपींना मोबाइलचे वाटप करण्यात आले. त्यानंतर पत्रकार परिषदेत मंत्री सामंत म्हणाले की, गुहागर विधानसभा मतदारसंघाबाबत आपली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नातेवाइकांनी फलक लावला, म्हणजे त्यांनाच विधानसभेची उमेदवारी मिळेल, असे होत नाही. मुख्यमंत्र्यांनी अद्याप कोणालाही उमेदवारी जाहीर केलेली नाही.जिल्ह्यातील ५ प्रांत कार्यालयांना प्रत्येकी ५ कोटींप्रमाणे जिल्हा नियोजनमधून नवीन इमारतीसाठी निधी मंजूर केलेला आहे. प्रांत कार्यालयांच्या इमारती जीर्ण झाल्याने तेथे नवीन प्रशस्त इमारती नजीकच्या काळात उभ्या राहतील. त्याचबरोबर जिल्ह्यातील तहसील कार्यालयांनाही नवीन वाहने दिली आहेत, चिपळूण शहराच्या ग्रॅव्हिटी पाणी योजनेसाठी शासनाने १५५ कोटींचा निधी दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.

'..त्यामुळे महायुतीच्या मतांमध्ये वाढ होत राहील'खासदार संजय राऊत यांच्या टीकेवर मंत्री सामंत म्हणाले की, राऊत हे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. त्यांच्या टीकेमुळे महायुतीच्या मतांमध्ये आणखी वाढ होत राहील. सामान्य जनताही त्यांच्या वक्तव्याची दखल घेत नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महिलांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे.

आधी मुख्यमंत्र्यांशी बोलायला हवे होतेशिवसेना नेते रामदास कदम यांनी गुहागरमधील उमेदवारीबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी होती. या चर्चेतून त्यांचा गैरसमज दूर झाला असता, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीguhagar-acगुहागरRamdas Kadamरामदास कदमEknath Shindeएकनाथ शिंदेUday Samantउदय सामंत