उमेदवार तुम्हीच ठरवा : उद्धव ठाकरेंची सूचना
By Admin | Updated: October 20, 2016 01:00 IST2016-10-20T01:00:27+5:302016-10-20T01:00:27+5:30
‘मातोश्री’वरून होणार घोषणा : रत्नागिरीतील नगराध्यक्ष निवडीचा सस्पेन्स कायम

उमेदवार तुम्हीच ठरवा : उद्धव ठाकरेंची सूचना
रत्नागिरी : रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्षपद उमेदवारीसाठी शिवसेनेतील तीन इच्छुकांशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी चर्चा केली. या तिघांनीच नगराध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित करावा, असे सांगत ठाकरे यांनी चेंडू इच्छुकांच्याच कोर्टात टाकला आहे. त्यामुळे उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम असून, इच्छुक उमेदवारही चक्रावले आहेत. तीनही उमेदवार आग्रही असल्याने ‘मातोश्री’वरूनच २४ आॅक्टोबरपर्यंत उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
रत्नागिरी नगरपरिषदेची निवडणूक २७ नोव्हेंबर २०१६ रोजी घोषित झाली आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास येत्या २४ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. राजकीय हालचालींना वेग आला आहे. यावेळी नगराध्यक्ष निवडणूक थेट पद्धतीने होणार आहे.
उमेदवारीसाठी शिवसेनेत ‘कॉँटे की टक्कर’ आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी बुधवारी सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी
तिघा इच्छुकांना मुलाखतीसाठी बोलाविले होते. निमंत्रणानुसार उमेदवारीसाठी इच्छुक माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, नगरसेवक बंड्या साळवी व राहुल पंडित हे मंगळवारी रात्रीच मुंबईला रवाना झाले होते. बुधवारी दुपारी २.३० वाजल्यानंतर मातोश्री बंगल्यावर या तिघांशी ठाकरे यांनी चर्चा केली. ठाकरे यांनी तिघांचीही ओळख करून घेतली. कोणाला अंतिम उमेदवारी द्यावी, याचा निर्णय या तिघांनीच आपापसांत चर्चा करून घ्यावा, असे ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे स्वतंत्र मुलाखतीविनाच या तीनही इच्छुकांना परत फिरावे लागले. या भेटीच्यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत व राजन साळवी तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी इच्छुकांच्या कोर्टात चेंडू टाकला असला तरी हे तिघेही उमेदवारीसाठी आग्रही आहेत. तिघांमध्ये सहमतीने एक नाव निश्चित होणे कठीण आहे. त्यामुळे २४ आॅक्टोबरपर्यंत सेना उमेदवाराचे नाव ‘मातोश्री’वरूनच घोषित होण्याची शक्यता आहे. आता उमेदवार या तिघांमधूून निवडणार की अन्य कुणा चौथ्याचे नशीब पालटणार, अशी चर्चाही रंगली आहे. (प्रतिनिधी)
चौकट
उमेदवार घोषणा टाळण्यामागे डावपेच?
रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदासाठी अन्य पक्षांच्या उमेदवारांची नावेही अद्याप अधिकृतपणे घोषित झालेली नाहीत. राष्ट्रवादीतर्फे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये, तर भाजपतर्फे विद्यमान नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्या नावांची चर्चा आहे. प्रत्येक पक्षाचे नेते दुसऱ्या पक्षातर्फे कोणत्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होते
उमेदवारीसाठी इच्छुक माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, नगरसेवक बंड्या साळवी व राहुल पंडित हे मंगळवारी रात्रीच मुंबईला रवाना झाले होते. बुधवारी दुपारी २.३० वाजल्यानंतर मातोश्री बंगल्यावर या तिघांशी ठाकरे यांनी चर्चा केली. ठाकरे यांनी तिघांचीही ओळख करून घेतली. कोणाला अंतिम उमेदवारी द्यावी, याचा निर्णय या तिघांनीच आपापसांत चर्चा करून घ्यावा, असे ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे स्वतंत्र मुलाखतीविनाच या तीनही इच्छुकांना परत फिरावे लागले. या भेटीच्यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत व राजन साळवी तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी इच्छुकांच्या कोर्टात चेंडू टाकला असला तरी हे तिघेही उमेदवारीसाठी आग्रही आहेत. तिघांमध्ये सहमतीने एक नाव निश्चित होणे कठीण आहे. त्यामुळे २४ आॅक्टोबरपर्यंत सेना उमेदवाराचे नाव ‘मातोश्री’वरूनच घोषित होण्याची शक्यता आहे. आता उमेदवार या तिघांमधूून निवडणार की अन्य कुणा चौथ्याचे नशीब पालटणार, अशी चर्चाही रंगली आहे. (प्रतिनिधी)