शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी पाेलिस भरतीत बीडच्या उमेदवाराने दिले बनावट प्रमाणपत्र, गुन्हा दाखल

By अरुण आडिवरेकर | Updated: June 22, 2023 18:52 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात २०२१ साली झालेल्या पोलिस शिपाई भरतीमध्ये बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. बीड ...

रत्नागिरी : जिल्ह्यात २०२१ साली झालेल्या पोलिस शिपाई भरतीमध्ये बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. बीड जिल्ह्यातील उमेदवाराने हा प्रताप केला असून, त्याला भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आले आहे. बनावट दस्ताऐवज सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धर्मराज राम दुधाळ (२६, रा. पाथर्डीनगर, हिवरसिंगा ता. शिरूर, जि. बीड) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध तत्कालीन रत्नागिरी जिल्हा पोलिस उपअधीक्षक (गृह) यांनी तक्रार दाखल केली आहे. राज्य शासनाकडून पोलिस शिपाई भरती २०२१ घेण्याच्या सूचना सर्व जिल्हा पोलिसांना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार मे महिन्यात रत्नागिरी जिल्हा पोलिसांकडून पोलिस शिपाई भरती घेण्यात आली.धर्मराज दुपाल यांची इतर मागास प्रवर्ग प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणामध्ये निवड करण्यात आली होती. त्यासंबंधी दुधाळ याने आपण प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. प्रमाणपत्राची सत्यता तपासण्यासाठी बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविले. बीड जिल्हाधिकारी यांनी संबंधित प्रमाणपत्र हे बनावट  असल्याचे सांगितले.प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड होताच दुधाळ याची प्राथमिक चौकशी पोलिसांकडून करण्यात आली. यावेळी आपण बनावट प्रमाणपत्र तयार केल्याची कबुली त्याने दिली. याप्रकरणी दुधाळ विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पाेलिस करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliceपोलिस