काेंढे येथील परिसर हाॅटस्पाॅट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST2021-06-30T04:20:41+5:302021-06-30T04:20:41+5:30

२. खेड नगरपालिकेकडून सोमवारी पालिकेच्या दवाखान्यात परदेशात जाणाऱ्या नागरिकांसाठी पहिल्या व दुसऱ्या कोविशिल्ड लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. २०० ...

Campus hotspot at Kandhe | काेंढे येथील परिसर हाॅटस्पाॅट

काेंढे येथील परिसर हाॅटस्पाॅट

२. खेड नगरपालिकेकडून सोमवारी पालिकेच्या दवाखान्यात परदेशात जाणाऱ्या नागरिकांसाठी पहिल्या व दुसऱ्या कोविशिल्ड लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. २०० लसींचे डोस लपलब्ध होते. परंतु, नियोजनाअभावी नागरिकांना भर पावसात भिजत चक्क रस्त्यावर रांग लावून लस घेण्यासाठी वाट पहावी लागली. या परिस्थितीबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी नगराध्यक्षांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब यांनी केली आहे.

३. गुहागर तालुक्यातील मच्छिमार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा मासेमारीसाठी समुद्रात जाणार आहेत. त्यामुळे हे मच्छिमार लसीकरणापासून वंचित राहू नयेत, यासाठी त्यांच्यासाठी प्राधान्याने विशेष लसीकरण मोहीम राबवावी, अशा मागणीचे निवेदन वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या नेत्रा ठाकून यांनी उपाध्यक्ष उदय बने यांना दिले. आरोग्य विभागाकडून गावोगावी लसीकरण मोहीम सुरू आहे.

Web Title: Campus hotspot at Kandhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.