बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम तीव्र करणार

By Admin | Updated: November 4, 2015 23:56 IST2015-11-04T23:16:47+5:302015-11-04T23:56:46+5:30

ग्रामीण भागात बोगस डॉक्टर्स, वैदूंचा सुळसुळाट आहे. पैशांच्या लोभापायी रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या २८ बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभागाकडून कारवाई कली आहे.

The campaign against the bogus doctor will be intensified | बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम तीव्र करणार

बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम तीव्र करणार

रत्नागिरी : ग्रामीण भागातील जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरोधात धाडसत्राची मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. त्यासाठी बोगस डॉक्टर जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीच्या सभेत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांची माहिती तत्काळ गोळा करून पोलिसांच्या मदतीने कारवाईची मोहीम राबवण्याचे आदेश दिले.
सध्या अ‍ॅलोपॅथी औषधांकडे रुग्णांचा कल अधिक आहे. होमिओपॅथी, आयुर्वेद आणि इलेक्ट्रोपॅथींना अ‍ॅलोपॅथी औषधांचा वापर न करण्याची शासनाच्या आरोग्य विभागाकडून सक्त ताकीद आहे.ग्रामीण भागात बोगस डॉक्टर्स तसेच वैदूंचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट आहे. केवळ पैशांच्या लोभापायी आतापर्यंत रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या २८ बोगस डॉक्टरांविरोधात जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईची धास्ती घेऊन अनेक बोगस डॉक्टरांनी गाशा गुंडाळला होता. मात्र, आता पुन्हा बोगस डॉक्टर्सनी डोके वर काढले आहे.
सध्या जिल्ह्यात २६ इलेक्ट्रोपॅथी, ७ नॅचरोपॅथी तसेच रजिस्टर मेडिकल प्रॅक्टीशनर, आयुर्वेदिक वैद्यविशारदरत्न, आयुर्वेदिक आणि सर्टिफिकेट नसलेला प्रत्येकी एक असे एकूण ३७ जण कार्यरत आहेत.
जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीची सोमवार २ नोव्हेंबर रोजी सभा झाली. या सभेमध्ये तालुकास्तरीय समितीने बोगस डॉक्टरांबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा नियमित आढावा घेऊन त्याची माहिती जिल्हास्तरीय समितीला सादर करावी. तसेच नगरपंचायत व नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी शहरी भागामध्ये बोगस वैद्यकीय व्यावसायिकांची माहिती जिल्हास्तरीय समितीला सादर करावी. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि पोलीस विभाग यांनी संयुक्तपणे बोगस डॉक्टरांविरोधात धाडसत्र आयोजित करुन त्यांच्याविरोधात मोहीम राबवावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. (शहर वार्ताहर)


तालुकानिहाय संख्या खालीलप्रमाणे आहे
तालुकाइलेक्ट्रोपॅथीनॅचरोपॅथी
मंडणगड२०
दापोली५२
खेड२०
चिपळूण१२
संगमेश्वर११
रत्नागिरी११
लांजा३०
राजापूर१११
आयुर्वेदिक वैद्यविशारदरत्न१
रजिस्टर मेडिकल प्रॅक्टीशनर१
सर्टिफिकेट नसलेला१
आयुर्वेदिक१


होमिओपॅथी, आयुर्वेद आणि इलेक्ट्रोपॅथी डॉक्टर यांनी अ‍ॅलोपॅथी औषधांचा वापर करू नये, अशी आरोग्य विभागाकडून सक्त ताकीद आहे. तरीही ग्रामीण भागातील जनतेच्या जिवाशी काही बोगस डॉक्टर खेळत आहेत. त्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात येणार आहे.


बोगस डॉक्टर जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची सभा.
बोगस डॉक्टरांविरोधात लवकरच धाडसत्र.
बोगस डॉक्टर्सकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ.
अहवाल सादर करण्याचे आदेश.

Web Title: The campaign against the bogus doctor will be intensified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.