शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

घराबाहेर न पडण्याचे आवाहन विनाकारण घराबाहेर पडलात तर कारवाई होणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 16:15 IST

रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांविरोधात रत्नागिरी पोलिसांनी कडक धोरण स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. वाहनचालकांबरोबरच सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर ...

ठळक मुद्दे रत्नागिरी पोलिसांचे कडक धोरणफिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांना तासभर बसण्याची शिक्षा शहरातील विविध भागात कडक पोलीस बंदोबस्त

रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांविरोधात रत्नागिरीपोलिसांनी कडक धोरण स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. वाहनचालकांबरोबरच सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना एकाच जागेवर एक तास बसून ठेवण्याची शिक्षा गुरूवारी देण्यात आली होती. तर शुक्रवारी सकाळी अवघ्या एका तासात तब्बल ४४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. चर्मालय, आयसीआयसी बँक आणि उद्यमनगर येथे ही कारवाई करण्यात आली.थोडीशी शिथिलता मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर विनाकारण लोक घराबाहेर पडू लागल्याने रत्नागिरी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळपासून कारवाई कठोरपणे सुरू केली. गुरुवारी वाहन घेऊन आणि मैदानावर वॉकसाठी बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी ९.५० ते ११ या मुदतीत उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या पथकाने अचानक कडक नाकाबंदी केली.चर्मालय तिठा, आयसीआयसी बँक चौक, उद्यमनगर चौक परिसर या ठिकाणी अचानक नाकाबंदी करून ४४ वाहन चालकांवर कारवाई केली. तसेच विनाकारण फिरणारे वाहने जप्ती व वाहनांवर हजारो रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. रोडवर किरकोळ कारणांकरीता फिरणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन बाहेर न फिरण्याबाबत समज दिली. अशा प्रकारची मोहीम सुरुच राहणार असून वाहन जप्ती कारवाई मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे, असे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे. पोलीस प्रशासनाने आत्तापर्यंत जवळजवळ १०० दुचाकी जप्त केल्या आहेत. तर चारचाकी वाहनेदेखील जप्त केली आहेत. ही सर्व वाहने पोलीस कवायत मैदानावर ठेवण्यात आली असून, लॉकडाऊन संपल्यानंतरच सर्व वाहने परत दिली जाणार आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकणPoliceपोलिस