शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आमदार भास्कर जाधवांनी हाती घेतले बसचे स्टेअरिंग, अनेकजण म्हणाले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 18:16 IST

कधी शेतात नांगरणी करताना तर कधी शिमगोत्सवात पालखी नाचविताना तर ग्रामदेवतेच्या मंदिरात नाचताना दिसणारे आमदार भास्कर जाधव चक्क बस चालवितानाच चिपळूणकरांना दिसले.

चिपळूण : कधी शेतात नांगरणी करताना तर कधी शिमगोत्सवात पालखी नाचविताना तर ग्रामदेवतेच्या मंदिरात नाचताना दिसणारे आमदार भास्कर जाधव चक्क बस चालवितानाच चिपळूणकरांना दिसले. भास्कर जाधव यांना बस चालविताना पाहून सारेच अवाक् झाले.चिपळूण महामार्गावरील एका कार्यालयातून एक नवी काेरी बस बाहेर पडली. रस्त्यावरुन चालणारी ही बस पाहून साऱ्यांनाच कुतूहल वाटले. अनेकजण नव्या काेऱ्या बसकडे पाहत असतानाच या बसच्या चालकाच्या जागी बसलेल्या व्यक्तीला पाहून अनेकांना धक्काच बसला. या चालकाच्या जागेवर चक्क चिपळूणचे आमदार भास्कर जाधव बसले हाेते आणि ते स्वत: ही बसच चालवत हाेते. हे सारे पाहिल्यानंतर सारेच अवाक् झाले. भास्कररावांनी अचानक बस का चालवली, असा प्रश्न अनेकांना पडला.

त्यानंतर या बस चालवण्यामागील किस्सा सर्वांसमाेर आला. भास्कर जाधव यांच्या लाेटेतील एका कार्यकर्त्याने व्यवसायासाठी ही बस आणली हाेती. बस घेऊन ताे मित्र थेट भास्कर जाधव यांच्या कार्यालयाजवळ आला. भास्कर जाधव यांनी श्रीफळ वाढविले आणि गाडीला हार घातला.पण ते एवढ्यावरच न थांबता गाडीत चढले, त्यांनी गाडीचे स्टेअरिंग हाती धरले आणि गिअर टाकून गाडी रस्त्यावर आणली. चिपळुणातून फेरफटका मारुन ते पुन्हा कार्यालयाजवळ आले. अत्यंत सफाईदारपणे गाडी चालविताना पाहून अनेकांनी तर ‘शेठ, तुमचे ड्रायव्हिंगही आहे ग्रेट’, अशी उपमाही देऊन टाकली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBhaskar Jadhavभास्कर जाधव