बसफेरी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:35 IST2021-09-22T04:35:37+5:302021-09-22T04:35:37+5:30
मंडणगड : मंडणगड, तिडे, तळेघर, नालासोपारा ही बस काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ...

बसफेरी सुरू
मंडणगड : मंडणगड, तिडे, तळेघर, नालासोपारा ही बस काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ही बस मंडणगडहून सकाळी ७.४५ वाजता सुटणार असून दुपारी ४ वाजता नालासोपारा येथे पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी सकाळी ६ वाजता नालासोपारा येथून सुटणार आहे.
पंचायत समिती सभा
राजापूर : येथील पंचायत समितीची मासिक सभा बुधवार २९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. पंचायत समितीच्या किसान भवनात ही सभा सभापती करुणा कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यात तालुक्यातील विविध शासकीय विभागाच्या कामांचा आढावा घेतला जाणार आहे. २९ रोजी सकाळी ११ वाजता ही सभा सुरू होणार आहे.
इंधन महागणार
रत्नागिरी : आधीच पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराने नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडू लागले आहे. जेमतेम वर्षभरातच शंभरी ओलांडलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरामुळे पुन्हा आता वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. कच्च्या तेलाचे दर वाढल्याने पुन्हा आता पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार आहेत.
रस्त्याची दुरुस्ती
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून पुन्हा पाऊस वाढला आहे. मात्रए या पावसातच शहरातील अनेक मार्गांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. हे खड्डे जांभ्या दगडाने भरले जात आहेत. त्यामुळे पाऊस सुरू असताना अनेक भागांमध्ये रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे. खड्ड्यांनी त्रस्त असलेले नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
२२ फुटी शिडी उपलब्ध
देवरुख : संगमेश्वर येथील मंगेश बुरशे यांनी २२ फुटी शिडी बाजारपेठेसाठी उपलब्ध करून दिली आहे. आपत्कालीन स्थितीत या शिडीचा वापर करता येणार आहे. प्रतिवर्षी बाजारपेठेला पुराचा वेढा बसतो अशावेळी दुकानातील माल बाहेर काढण्यासाठी या शिडीचा उपयोग होणार असल्याने व्यापाऱ्यांकडून धन्यवाद दिले जात आहेत.