बसला धडक, ट्रक चालकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:33 IST2021-04-09T04:33:39+5:302021-04-09T04:33:39+5:30
चिपळूण : ट्रकने एसटी बसला धडक दिल्याची घटना कुंभार्ली घाटात बुधवारी सायंकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी ट्रक चालकावर ...

बसला धडक, ट्रक चालकावर गुन्हा
चिपळूण : ट्रकने एसटी बसला धडक दिल्याची घटना कुंभार्ली घाटात बुधवारी सायंकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोहर हनुमंत लाड (३४, रा. गुंजावळी पाटण) असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.
याबाबतची फिर्याद सचिन शंकर कोकरे (४०, रा. इचलकरंजी) यांनी दिली आहे. या अपघातात शामराव दगडू पिंपळे (रा. पाटण) हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लाड याच्या ताब्यातील ट्रक कुंभार्ली घाटाच्या रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या नाल्यात पुढील चाक उतरल्याने आडवा करून कराड बाजूकडे तोंड करून उभा होता. याचवेळी ट्रकच्या पाठीमागील बाजूने बसचालक कोकरे हे बस घेऊन जात असताना ट्रकचालक लाड याने अचानक ट्रक सुरू करून जोरात पाठीमागे घेतला. यामुळे ट्रकची बसच्या उजव्या बाजूला जोराची ठोकर लागली. या अपघातामध्ये बसचे मोठे नुकसान झाले असून, शामराव पिंपळे हे जखमी झाले आहेत.