हातखंबा येथील अपघातात बसचालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 18:47 IST2017-08-28T18:45:51+5:302017-08-28T18:47:10+5:30
रत्नागिरी : गोव्याहून मुंबईकडे जाणारी खासगी बस (क्र. टऌ04 ऋङ 126 ) ट्रकवर आदळेल या भीतीने बसबाहेर उडी मारणाºया बसचालकाचा मृत्यू झाला.

हातखंबा येथील अपघातात बसचालक ठार
रत्नागिरी : गोव्याहून मुंबईकडे जाणारी खासगी बस (क्र. टऌ04 ऋङ 126 ) ट्रकवर आदळेल या भीतीने बसबाहेर उडी मारणाºया बसचालकाचा मृत्यू झाला.
गोव्याहून मुंबईकडे जाणारी ही खासगी बस हातखंबा येथे आली असता समोरुन येणाºया ट्रकवर ती आदळेल, या भीतीने बसचालकाने रस्त्याच्या बाजूला उडी मारली. बस ट्रकवर आदळत असताना रस्ता सोडून रस्त्याकडेच्या खोलगट भागात घसरली. त्यामुळे बस खोलात उतरत असताना चालकाने उडी मारली असता रस्त्याच्या बाजूला असणाºया रेलिंगवर चालक आपटला.
त्यात त्याचा मृत्यू झाला. या बस मध्ये फक्त चार प्रवासी होते. या अपघातात इतर कोणीही जखमी झाले नसून हातखंबा गुरववाडी येथील तरुण मदतकार्य करीत आहेत. पोलिस अधिक तपास करीत असून बसचालकाचे नाव अद्याप समजले नाही.