ओणी येथे घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:35 IST2021-09-21T04:35:29+5:302021-09-21T04:35:29+5:30

राजापूर : तालुक्यातील ओणी येथे घरफोडी झाल्याची घटना घडली. चोरट्यांनी रोख रक्कम व बेंटेक्सचे दागिने असा साडेआठ हजारांचा ऐवज ...

Burglary at Oni | ओणी येथे घरफोडी

ओणी येथे घरफोडी

राजापूर : तालुक्यातील ओणी येथे घरफोडी झाल्याची घटना घडली. चोरट्यांनी रोख रक्कम व बेंटेक्सचे दागिने असा साडेआठ हजारांचा ऐवज व कागदपत्रे लंपास केली.

घरमालक रमेश दादू गुरव दिलेल्या तक्रारीवरून राजापूर पोलिसांनी तक्रार नोंद केली आहे. ओणी गोरुलेवाडी येथे रमेश दादू गुरव यांचे घर असून, मुंबईतील निवासस्थानी त्यांचा गणपती असल्याने ते मुंबईला मुक्कामी होते. त्यांचा भाचा प्रशांत सत्यवान गुरव हे त्या घरी एकटेच राहतात. ओणी येथे त्यांचे कापड दुकान असून, ते घरी नव्हते. शुक्रवार दिनांक १७ सप्टेंबरला दुपारी एक ते सायंकाळी पाच अज्ञात चोरट्याने मागील बाजूचा दरवाजा फोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट तोडून आतील महत्त्वाची कागदपत्रे, बँक पासबुक, बँटेक्सचे दोन ग्रॅमचे दागिने व काही रोख रक्कम असा साडेआठ हजार रुपयांचा माल लंपास केला.

सायंकाळी प्रशांत गुरव हे ओणीतील दुकान बंद करून घरी आले, त्यावेळी त्यांना झालेला प्रकार लक्षात आला. त्यांनी ताबडतोब मुंबईला रमेश गुरव यांच्याशी संपर्क साधून त्यांना कल्पना दिली. दुसऱ्या दिवशी रमेश गुरव गावी आले व त्यांनी राजापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. घटनास्थळी श्वानपथकासह ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. त्यांच्याद्वारे तपास करण्यात आला. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल अनंत तिवरेकर अधिक तपास करत आहेत.

Web Title: Burglary at Oni