देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथील कवळकर वाडी, जोगळेवाडी, मोबरकर वाडी, शिगवणवाडी येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केला आहे. आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या कार्यकर्त्यांनी हा पक्षप्रवेश केला आहे.
चंद्रकांत शिगवण, मनोहर मोबारकर, दत्ताराम मोबारकार, शंकर कवलकर, प्रभाकर शिगवण, अशोक शिगवण, मनोहर जोगले, सखाराम जोगले, वसंत जोगले, रघुनाथ जोगले, यशवंत जोगले, उदय शिगवण, गणेश शिगवण, विलास कवळकर, बावा शिगवण आदी प्रमुख लोकांच्या उपस्थितीत वाडीतील ग्रामस्थांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
आपण या सर्वांच्या कायम पाठीशी राहू, असे आश्वासन आमदार शेखर निकम यांनी दिले आहे. यावेळी महेश बाष्टे, शेखर उकर्डे, सुरेश घडशी, शशी घाणेकर, अमित माचिवले, बबु कवलकर, सुरेश कांगणे, बंड्या किंजलकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
130921\2351img-20210912-wa0147.jpg
राष्ट्रवादीत प्रवेश