शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

फसवणूकप्रकरणी बिल्डर्सवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 21:54 IST

Crimenews, Fraud, police, ratnagirinews ब्राह्मण हितवर्धिनी बिगरशेती सहकारी पतसंस्था, शाखा देवरुखची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई-डोंबिवली येथील राणे होम्स बिल्डर्सवर देवरुख पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयसिंग राणे असे त्या बिल्डर्सचे नाव आहे. १७ लाख ६५ हजार ३०२ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देफसवणूकप्रकरणी बिल्डर्सवर गुन्हा दाखल१७ लाख ६५ हजारांची फसवणूक केल्याचा आरोपावरून कारवाई

देवरुख : ब्राह्मण हितवर्धिनी बिगरशेती सहकारी पतसंस्था, शाखा देवरुखची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई-डोंबिवली येथील राणे होम्स बिल्डर्सवर देवरुख पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयसिंग राणे असे त्या बिल्डर्सचे नाव आहे. १७ लाख ६५ हजार ३०२ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार याबाबतची फिर्याद ब्राह्मण हितवर्धिनी बिगरशेती सहकारी पतसंस्था, शाखा देवरुखचे शाखाधिकारी जयेश विलास जोशी यांनी दिली आहे. या फिर्यादीमध्ये जयसिंग गोपाळराव राणे, प्रोप्रा. राणे होम्स बिल्डर्स अँण्ड डेव्हलपर्स यांच्या विरोधात १७ लाख ६५ हजार ३०२ रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.जयसिंग राणे यांनी ब्राह्मण हितवर्धिनी पतसंस्था, शाखा देवरुखमध्ये जात आपण राणे होम्स बिल्डर्स अँण्ड डेव्हलपर्स असल्याचे सांगत विश्वास संपादन केला व पतसंस्थेकडे नवीन वाहन तारण कर्ज मंजूर करुन घेण्यासाठी १५ लाख रुपये कर्जाकरिता अर्ज केला. त्यासोबत संस्थेला आवश्यक असणारी कागदपत्रे (दस्तऐवज) खोटी व बनावट तयार करुन ती खरी आहेत, असे भासवले आणि ती कागदपत्रे कर्ज मंजुरीकरिता पतसंस्थेमध्ये जमा करुन कर्ज मंजूर करुन घेतले. त्या कर्जाच्या नियमाप्रमाणे आजपर्यंत १७ लाख ६५ हजार ३०२ रुपये व्याजासह परफेड न करता, त्यांनी पतसंस्थेची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.संस्थेकडून मंजूर झालेल्या कर्जामधून खरेदी केलेल्या वाहनाची रजिस्ट्रेशन कागदपत्रेही तारण म्हणून जमा केलेली नाहीत. गाडी घेतल्यापासून आजपर्यंत त्यांनी कधीही गाडीचे हप्ते जमा केलेले नसल्याचेही जयेश जोशी यांच्या या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

खोटी कागदपत्रे देऊन संस्थेची दिशाभूल करुन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी जयसिंग राणे यांच्यावर भारतीय दंड विधान कलम १९९, २००, १९३ (२), ४०५, ४०६, ४१५, ४१७, ४२०, ४२१, ४२२, ४२७, ४६४, ४६७, ४६८, ४६९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक १० जुलै २०१५ ते १९ ऑगस्ट २०२० या कालावधीत हा गुन्हा घडला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बाईंग करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी