‘अल्ट्राटेक’कडून हनुमान मंदिराला बाकड्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:27 IST2021-03-22T04:27:47+5:302021-03-22T04:27:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : येथील अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडतर्फे कंपनीचे हेड डी. एस्. चंद्रशेखर यांच्या ...

‘अल्ट्राटेक’कडून हनुमान मंदिराला बाकड्यांची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : येथील अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडतर्फे कंपनीचे हेड डी. एस्. चंद्रशेखर यांच्या हस्ते रत्नागिरी शहराजवळील किल्ला येथील हनुमान मंदिराला भाविकांना बसण्यासाठी बाकड्यांची भेट देण्यात आली.
शहराजवळील भगवती बंदर किल्ले रत्नदुर्ग दिंडी दरवाजातील श्री समर्थ रामदास स्वामी स्थापित जागृत देवस्थान श्री हनुमान मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम सुरु आहे. भाविकांना मंदिराच्या परिसरात बसण्यासाठी सहा बाकडी कंपनीचे युनिट हेड डी. एस्. चंद्रशेखर यांनी श्री हनुमान सेवा मंडळाचे अध्यक्ष शेषकुमार मालुसरे आणि ग्रामस्थांकडे सुपूर्द केली. कंपनीच्या या सामाजिक कार्याबद्दल मंदिराचे अध्यक्ष शेषकुमार मालुसरे, आशिष मोरे, रमेश आयरे तसेच ग्रामस्थांनी आभार मानले. यावेळी कंपनीचे अधिकारी संतोष पाटील व अन्य उपस्थित होते.