निवडक २६ शाळांमध्ये ब्रॉडबॅण्ड

By Admin | Updated: July 9, 2015 00:02 IST2015-07-09T00:02:28+5:302015-07-09T00:02:28+5:30

सुहास कांबळे : रत्नागिरी, चिपळूणसह गणपतीपुळेत हॉटस्पॉट सेवा

Broadband in select 26 schools | निवडक २६ शाळांमध्ये ब्रॉडबॅण्ड

निवडक २६ शाळांमध्ये ब्रॉडबॅण्ड

रत्नागिरी : रत्नागिरी व सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील २६ शाळा बीएसएनएल ब्रॉडबॅण्डद्वारे लवकरच जोडण्यात येणार आहेत. याद्वारे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना फ्री ई-लर्निंग सुविधा उपलब्ध होणार आहे. वाय-फाय सिटी, हॉट स्पॉट सेवा रत्नागिरी आणि चिपळूण या शहरांत व पर्यटनस्थळ गणपतीपुळे येथे मार्च २०१५पर्यंत कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती बीएसएनएलचे महाप्रबंधक सुहास कांबळे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पतेतून उदयास आलेला डिजिटल इंडिया विक १ ते ७ जुलै या कालावधीत बीएसएनएलच्या येथील कार्यालयात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची सांगता करण्यात आली.
१ रोजी पंतप्रधान मोदी यांचे उद्घाटनपर झालेले भाषण यावेळी कार्यालयात ऐकविण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना ई-लर्निंगअंतर्गत दूरध्वनी केंद्राची माहिती देण्यात आली. नाईट फ्री कॉल्स आणि नॅशनल रोमिंंग फ्री, या योजना जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध ग्राहक सेवा केंद्रांवर मेळावे आयोजित करण्यात आले. तसेच बीएसएनएलतर्फे ट्रेनिंग घेत असलेल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना मोफत सीमकार्डचे वाटप करण्यात आले.
मंडणगड, खेड, संगमेश्वर आणि रत्नागिरी येथील ३८३ ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबरद्वारे जोडण्याचे काम मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. यापैकी अतिदुर्गम भाग मंडणगड येथे ९० % काम पूर्ण झाले असून, १५ ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबर केबलद्वारे जोडण्याचे काम पूर्ण झाल्याचेही कांबळे यांनी यावेळी सांगितले.
रत्नागिरी - सिंंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल इंडिया या उपक्रमांतर्गत ई-लर्निंग सुविधा रत्नागिरी व सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील २६ शाळांना बीएसएनएल ब्रॉड बॅण्डद्वारे लवकरच जोडण्यात येणार आहे. याद्वारे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना फ्री ई-लर्निंग सुुविधा उपलब्ध होणार आहे, अशी माहितीही कांबळे यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Broadband in select 26 schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.