शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : देवरूखातील ब्रिटीशकालीन शाळा मोडकळीस, काम मंजूर होत नसल्याने नाराजीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 16:47 IST

संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सध्या अखेरच्या घटका मोजत आहे ब्रिटीशांनी १९१९ साली बांधलेली ही शाळा आता धोकादायक बनली आहे. मात्र, तरीही येथील विद्यार्थ्यांना या धोकादायक व गळक्या शाळेत बसण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यात ही शाळा गळत असल्याने विद्यार्थ्यांना या गळक्या शाळेत बसूनच धडे गिरवावे लागतात.

ठळक मुद्दे- आरवली केंद्रशाळेला चार वर्गखोल्या मंजूर करण्याचे निर्देश - मागणी केलेल्या कामांपैकी कोणतेच काम मंजूर होत नसल्याने नाराजीचा सूर- आरवली केंद्र शाळेत शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊनच - शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत ग्रामस्थ

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सध्या अखेरच्या घटका मोजत आहे ब्रिटीशांनी १९१९ साली बांधलेली ही शाळा आता धोकादायक बनली आहे. मात्र, तरीही येथील विद्यार्थ्यांना या धोकादायक व गळक्या शाळेत बसण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यात ही शाळा गळत असल्याने विद्यार्थ्यांना या गळक्या शाळेत बसूनच धडे गिरवावे लागतात.जिल्हा परिषद शिक्षण विभाग दरवर्षी साधारण दोन कोटी रुपये शिक्षणावर खर्च करतो. यामध्ये नवीन शाळा बांधणे, शाळा दुरुस्ती करणे आदी कामे होत असतात. मात्र, आरवली येथे मागणी करुनही वर्गखोल्या मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.

आरवली केंद्र शाळेतील विद्यार्थी हे धोकादायक व गळक्या शाळेत बसत असतानादेखील प्रशासन त्याकडे डोळेझाक करत आहे. या शाळेची दुरुस्ती वेळेत केली गेली नाही तर विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

आरवली हे मुंबई - गोवा महामार्गवरील गजबजलेले ठिकाण असून, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या नेहमीच्या मार्गावरील असलेल्या या केंद्र शाळेकडे त्यांचे का लक्ष जात नाही, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.

पहिली ते सातवीपर्यंत असणाऱ्या येथील केंद्र शाळेत ६७ मुली आणि ६७ मुले अशी एकूण १३४ पटसंख्या आहे. परंतु, येथील विद्यार्थ्यांना दररोज भीतीच्या सावटाखालीच अभ्यास करावा लागत आहे.शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील शाळांना शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी किचन शेडचे वितरण करण्यात आले. मात्र, आरवली शाळेला किचनशेड दिलेली नाही.

किचनशेड वितरणाची जबाबदारी ही ठेकेदारावर असताना किचनशेड का देण्यात आली नाही, याची चौकशी तालुका शिक्षणाधिकाऱ्यांनी का केली नाही, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. तर चालू आर्थिक वर्षात शाळेला संरक्षक भिंत बांधून मिळावी, अशीही मागणी केली होती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSchoolशाळा