शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: केसमधून निर्दोष मुक्त करण्यासाठी दीड लाखाची लाच, सरकारी वकीलाला रंगेहात पकडले

By संदीप बांद्रे | Updated: January 10, 2025 15:33 IST

एसीबीची चिपळूणात मोठी कारवाई

चिपळूण : घरडा कंपनीच्या केस मधून निर्दोष मुक्त करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे तब्बल ५ लाखाची मागणी करून त्यातील दीड लाख रुपये स्वीकारताना खेड न्यायालयातील सरकारी वकील राजेश देवराव जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. चिपळूण येथील हॉटेल ओयासिस मध्ये गुरुवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.यासंदर्भात अँटिकरप्शन ब्युरोकडून मिळालेल्या माहितीनुसार घरडा कंपनीच्या संदर्भात एक खटला खेड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १ यांच्या न्यायालयात सुरू आहे. तक्रारदार वकील पत्राद्वारे आपली बाजू मांडत आहेत. तर सरकारी अभियोक्ता म्हणून ऍड.राजेश जाधव हे सरकारपक्षाच्या वतीने काम पाहत होते.

दरम्यान २६ डिसेंम्बर २०२४ व ३ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या पडताळणी मध्ये तक्रारदार यांना राजेश जाधव यांनी साक्षीदार यांना शिकवणार नाही. तुमची केस कशी सुटेल यासाठी प्रयत्न करेन. जास्त सरतपास न करता महत्वाचे मुद्दे वगळून आरोपी कसे सुटतील यासाठी प्रयत्न करेन व केस लवकर संपवायला मदत करेन. त्यासाठी ५ लाख रुपये द्यावे लागतील अशी, मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती.त्यापैकी पहिला हफ्ता म्हणून दीड लाख रुपये देण्याचे ठरले होते. याची माहिती अँटीकरप्शन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी चिपळूण येथील हॉटेल ओयासिस हॉटेल परिसरात गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजता सापळा रचला आणि दीड लाखाची लाच घेताना राजेश जाधव यांना रंगेहात पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई  ठाणे परीक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक संजय गोविळकर, अप्पर पोलिस अधीक्षक गजानन राठोड, अप्पर पोलिस अधीक्षक सुहास शिंदे, रत्नागिरी क्षेत्राचे पोलिस अधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणadvocateवकिलBribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग