वाहनाच्या गतीला वेगनियंत्रकाचा ‘ब्रेक’
By Admin | Updated: September 24, 2015 23:56 IST2015-09-24T23:06:56+5:302015-09-24T23:56:36+5:30
नवा वाहन नियम : प्रती तास ८० किलोमीटर वेग निर्धारित

वाहनाच्या गतीला वेगनियंत्रकाचा ‘ब्रेक’
रत्नागिरी : मोटार वाहन कायदा १९८८च्या कलम ४१ (४)नुसार केंद्र शासनाकडून १ आॅक्टोबर २०१५ वा त्यानंतर उत्पादीत होणाऱ्या परिवहन वाहनांना उत्पादकांकडून उत्पादनाच्या वेळेस किंवा डिलरकडून जास्तीतजास्त ८० किलोमीटर प्रती तास वेग निर्धारीत केलेला वेग नियंत्रक बसविंणे सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, यातून काही वाहने वगळण्यात आली आहेत.
केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९च्या नियम ११८मध्ये सुधारणा करुन नवीन नियम समाविष्ट करण्यात आला आहे. या नियमानुसार मोटार वाहन कायदा १९८८च्या कलम ४१ (४) नुसार कें द्र शासनाने अधिसूचित केलेल्या आणि १ आॅक्टोबर २०१५ किंवा त्यानंतर उत्पादीत होणाऱ्या परिवहन वाहनांना उत्पादकांकडून उत्पादनाच्या वेळेस किंवा डिलरकडून वितरणाच्या वेळेस वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार अकर 018 : 2012 च्या मानकाची पूर्तता करणारा जास्तीतजास्त ८० किलोमीटर प्रती तास वेग निर्धारीत केलेला वेग नियंत्रक बसविंणे आवश्यक आहे. १ आॅक्टोबर २०१५ किंवा त्यानंतर उत्पादीत होणारी वाहने डंपर्स, ट्रक, स्कूल बसेस, धोकादायक मालांची वाहतूक करणारी वाहने किंवा केंद्रशासन राजपत्रातील अधिसूचनेनुसार निर्देशित केलेली इतर कोणत्याही संवर्गातील वाहने यांना उत्पादकांकडून उत्पादनाच्या वेळेस किंवा डिलरकडून वितरणाच्या वेळेस वेग नियंत्रक बसविणे आवश्यक आहे. अकर 018 : 2012 च्या मानकास अनुसरुन जास्तीतजास्त ६० किलोमीटर प्रती तास वेग नियंत्रित केलेला असणे आवश्यक आहे.
मात्र, यातून काही वाहने वगळण्यात आली आहेत. यात दुचाकी वाहने, तीनचाकी वाहने, क्वाड्री सायकल, प्रवासी व त्यांचे सामान वाहून नेण्यासाठी उपयोगात आणलेली चारचाकी वाहने, ज्यांची आसनक्षमता चालकास धरुन ८पेक्षा जास्त नसेल आणि त्याचे एकूण स्थूल वजन ३५ किलोग्रॅमपेक्षा जास्त नसेल अशी वाहने, अग्निशामक वाहने, रुग्णवाहिका, पोलीस विभागाची वाहने, नियम १२६ मध्ये विहित केलेल्या तपासणी संस्थेने सत्यापित व प्रमाणित केलेल्या ज्याचा वेग ८० किलोमीटर प्रती तासापेक्षा अधिक नाही अशी वाहने यांचा समावेश आहे. यामुळे काही अंशी वेगावर नियंत्रण येण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)