आवटी, पावसकर, सावंत यांना कांस्यपदक
By Admin | Updated: June 14, 2014 01:38 IST2014-06-14T01:19:29+5:302014-06-14T01:38:21+5:30
कोईम्बतूर, तामिळनाडू येथे पंधरावी राष्ट्रीय सबज्युनिअर (मुले, मुली) पॉवर लिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धा

आवटी, पावसकर, सावंत यांना कांस्यपदक
रत्नागिरी : इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशनच्या मान्यतेने व तामिळनाडू राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनतर्फे कोईम्बतूर, तामिळनाडू येथे पंधरावी राष्ट्रीय सबज्युनिअर (मुले, मुली) पॉवर लिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धा झाली. विविध राज्यांतून ४०० खेळाडू यात सहभागी झाले होते. यात रत्नागिरीतील सिमनर आवटी, अनुजा सावंत, प्रतीक देसाई, विक्रांत माईण व प्रथमेश पावसकर या पाच खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या संघात निवड झाली. यातील आवटी, सावंत आणि पावसकर या तिघांना कांस्यपदक मिळाले आहे.
मुलींच्या स्पर्धेत ४३ किलो वजनी गट : सिमरन शब्बीर आवटी हिने स्क्वॉट ६५ किलो बेंच २७.५ किलो व डेड ७० किलो असे एकूण १६० किलो वजन उचलून कांस्य पदक पटकावले. ७२ किलो वजनीगट : अनुजा दिलीप सावंत हिने स्कॉट ११२.५ किलो बेंच ५० किलो व डेड १०० किलो असे एकूण २६२.५ किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले.
मुलांच्या स्पर्धेत १०५ किलो वजनी गट : प्रथमेश हरिश्चंद्र पावसकर याने स्क्वॉट १७० किलो, बेंच ९५ किलो व डेड २०० किलो असे एकूण ४६५ किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले. ६६ किलो वजनी गट : प्रतीक संपतराव देसाई याने स्क्वॉट १७० किलो, बेंच ९५ किलो व डेड १७५ किलो असे एकूण ४४० किलो वजन उचलून पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. (प्रतिनिधी)