आशिष शेलार यांच्याकडून लोटिस्माला पुस्तके भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:07 IST2021-09-02T05:07:29+5:302021-09-02T05:07:29+5:30

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराला भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार आशिष शेलार यांनी ६५० पुस्तके भेट दिली. ...

Books gift to Lotisma from Ashish Shelar | आशिष शेलार यांच्याकडून लोटिस्माला पुस्तके भेट

आशिष शेलार यांच्याकडून लोटिस्माला पुस्तके भेट

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराला भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार आशिष शेलार यांनी ६५० पुस्तके भेट दिली. कोकण विकास आघाडी या भाजप संस्थेचे मुंबई अध्यक्ष सुहास आडिवरेकर यांनी ही ग्रंथ संपदा लोटिस्माचे कार्यवाह धनंजय चितळे यांच्याकडे सुपूर्द केली.

यावेळी कोकण विकास आघाडीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजाराम मोरे, तालुकाध्यक्ष संतोष शिंदे उपस्थित होते. सुहास आडिवरेकर यांनी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराला यापुढेही आमचे नेते आशिष शेलार सर्वतोपरी मदत करणार आहेत. हे वाचनालय व संग्रहालय पुन्हा एकदा नव्या दिमाखात उभे राहिल, असा आशावाद व्यक्त केला. यावेळी चिपळूणचे माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक निशिकांत भोजने यांच्या हस्ते आडिवरेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेविका रसिका देवळेकर, परिमल भोसले, तालुका अध्यक्ष विनोद भोबस्कर तसेच लोटिस्माचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Books gift to Lotisma from Ashish Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.