मतदार यादीत बोगस नाव
By Admin | Updated: July 9, 2014 00:27 IST2014-07-09T00:23:26+5:302014-07-09T00:27:07+5:30
खेर्डी गावातील मतदार यादीत

मतदार यादीत बोगस नाव
चिपळूण : खेर्डी गावातील मतदार यादीत बोगस नावे असल्याने या मतदार यादीची चौकशी करावी, अशी मागणी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार पाटील यांच्याकडे केली आहे.
तहसीलदार वृषाली पाटील यांना युवा सेनेचे विभागप्रमुख उमेश खताते, वार्ड क्र. ४ चे राजू थरवळ, ऋषी थरवळ, महेश महाडिक यांनी निवेदन देऊन खेर्डीतील मतदार यादीत घोळ असून, बोगस नावे असावीत, असा संशय व्यक्त केला आहे.
सत्ताधारी सत्तेचा गैरवापर करुन बोगस नावे वाढवत असल्याची तक्रार या कार्यकर्त्यांनी केली आहे. याची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन तहसीलदार पाटील यांना सादर करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)े