शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri Crime: घाटीवळे रुळाजवळ सापडला अज्ञात नेपाळी तरुणाचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 17:15 IST

खिशात सापडले चेकबुक, मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास पाेलिस करत आहेत

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील घाटीवळे येथील रेल्वे रुळालगत असणाऱ्या गटारात सुमारे २५ वर्षांच्या एका अनोळखी नेपाळी तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार रविवारी (२८ डिसेंबर) सकाळी पावणेआठ वाजता उघडकीला आला. या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे कळू शकलेले नाही.याबाबतची माहिती पोलिस पाटील दीपक कांबळे यांनी साखरपा पोलिसांना दिली. त्यानंतर साखरपा पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहायक पोलिस फौजदार शांताराम पंदेरे, हेडकॉन्स्टेबल संजय करंडे, कॉन्स्टेबल स्वप्निल कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली.हा मृतदेह अंदाजे २५ वर्षांच्या तरुणाचा असून, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याची उंची ५ फूट ५ इंच असून, रंग गोरा आणि अंगावर जीन्स पॅंट व काळे फुल शर्ट आहे. पाेलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास पाेलिस करत आहेत.

खिशात सापडले चेकबुकया तरुणाच्या खिशात चेकबुक सापडले असून, ते नेपाळ बॅंक लि.चे आहे. त्यावर लक्ष्मी गीरी साम दिलमया गीरी असे नाव लिहिलेले होते. मात्र, हे चेकबुक त्याचेच आहे का, हे निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे नावाचा उलगडा हाेत नसल्याचे देवरुखचे पोलिस निरीक्षक उदय झावरे यांनी सांगितले. जिल्ह्यात कामासाठी आलेल्या व ज्यांच्याकडे नेपाळी माणसे कामाला आहेत त्यांना याबाबत माहिती मिळाल्यास साखरपा किंवा देवरुख पोलिस स्थानकाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Unknown Nepali Youth Found Dead Near Railway Tracks in Ratnagiri

Web Summary : A 25-year-old Nepali man's body was found near railway tracks in Ratnagiri. Police are investigating the cause of death after discovering head injuries. A Nepal Bank checkbook was found, investigation underway.