पाेहताना बेपत्ता झालेल्या प्रौढाचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:34 IST2021-09-18T04:34:54+5:302021-09-18T04:34:54+5:30

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील पूर झेपलेवाडी येथील पोहायला गेलेल्या आठ तरुणांपैकी तीन तरुण बुडाल्याची घटना बुधवारी (१५ सप्टेंबर) ...

The body of a missing adult was found while looking | पाेहताना बेपत्ता झालेल्या प्रौढाचा मृतदेह आढळला

पाेहताना बेपत्ता झालेल्या प्रौढाचा मृतदेह आढळला

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील पूर झेपलेवाडी येथील पोहायला गेलेल्या आठ तरुणांपैकी तीन तरुण बुडाल्याची घटना बुधवारी (१५ सप्टेंबर) घडली होती. या घटनेत एकाचा मृत्यू झाला होता, एकाला वाचवण्यात यश आले होते तर एक जण बेपत्ता झाला होता. त्यांचा मृतदेह तेथून ३ किलाेमीटर अंतरावर शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्यान सप्तलिंगी नदीपात्रात कुडवली बौद्धवाडीनजीक डाम्ब याठिकाणी आढळला. संजय सीताराम घाटकर (४८) असे त्यांचे नाव आहे.

तालुक्यातील पूर झेपलेवाडीतील आठ जण जिल्हा परिषद शाळेनजीकच्या जांभळाचे उतरण याठिकाणी सप्तलिंगी नदीपात्रात बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी गेले होते. यापैकी अशोक झेपले (५०), संजय सीताराम घाटकर व हर्ष घाटकर (१५) हे तिघे जण पाण्यात उतरले; मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे तिघे जण पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. याचवेळी संजय घाटकर हे अचानक दिसेनासे झाले. तर अशोक झेपले हे खालील बाजूला असणाऱ्या सिमेंट नाला बंधाऱ्यावरून वाहून खालील बाजूस गेले त्याला व हर्ष घाटकर या दोघांना इतर सहकाऱ्यांनी पाण्यातून बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी देवरूख ग्रामीण रुग्णालयात आणले. याठिकाणी डाॅक्टरांनी तपासल्यानंतर अशोक झेपले यांना मृत घोषित केले. तर हर्ष घाटकर याच्यावर उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले आहे.

त्यानंतर बेपत्ता असलेल्या संजय घाटकर यांचा शोध घेण्यासाठी गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून येथील ग्रामस्थ व देवरूखमधील राजू काकडे हेल्प ॲकॅडमीचे कार्यकर्ते यांनी शोधमोहीम सुरू केली. त्यांचा थांगपत्ता न लागल्याने हे शोधकार्य सायंकाळी ६ वाजता थांबण्यात आले होते. शोधकार्यासाठी शुक्रवारी चिपळूण येथील एनडीआरएफच्या टीमला बाेलावण्यात आले हाेते. त्याचवेळी घाटकर यांच्या भावकीतील आणि शेजारीही शोध घेत होते. यावेळी त्यांना कुडवली बौद्धवाडी येथील डाम्ब या ठिकाणी झाडीमध्ये संजय यांचा मृतदेह अडकलेल्या स्थितीत दिसलाण याची माहिती देवरुख पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

170921\20210917_183524.jpg

सप्तालिंगी नदी पात्रात शोध घेताना एनडीआरएक चे जवान

Web Title: The body of a missing adult was found while looking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.