शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

जयगड येथे बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 14:39 IST

मासे गरवण्यासाठी गेलेल्यांपैकी एकजण बुडाल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमाराला जयगड येथे घडली होती. या युवकाचा मृतदेह सोमवारी सकाळी तेथूनच १०० मीटरच्या परिसरात आढळून आला. वीरांची विलास खापले (१८, रा. पन्हळी, जयगड) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे.

ठळक मुद्देजयगड येथे बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडलामासे गरवण्यासाठी गेला होता

रत्नागिरी : मासे गरवण्यासाठी गेलेल्यांपैकी एकजण बुडाल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमाराला जयगड येथे घडली होती. या युवकाचा मृतदेह सोमवारी सकाळी तेथूनच १०० मीटरच्या परिसरात आढळून आला. वीरांची विलास खापले (१८, रा. पन्हळी, जयगड) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे.वीरांची हा रविवारी सकाळी आपल्या मित्रांसोबत मासे गरवण्यासाठी जयगड कासारी येथील बंधाऱ्यावर गेला होता. रविवारी समुद्राला अमावास्येची भरती होती. पाण्याचा जोर नेहमीपेक्षा अधिक होता तसेच पाण्याला करंटही होता. पाण्याची पातळीही नेहमीपेक्षा वाढली होती.मासे गरवत असताना वीरांचीचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला. पाण्याच्या प्रवाहासोबत वीरांची वाहत असल्याचे लक्षात येताच मित्रांनी आरडाओरड सुरू केली. तेथीलच जवळच्या गावातील ग्रामस्थ मदतीसाठी दाखल होईपर्यंत वीरांची पाण्यात बुडाला.

या घटनेची खबर स्थानिक पोलीस पाटील आणि प्रशासनाला देण्यात आली. रविवारी रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. सोमवारी सकाळी पुन्हा त्याचा शोध घेण्याचे काम सुरू होते. तो बुडालेल्या ठिकाणापासून १०० मीटर अंतरावर त्याचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी जयगड पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.भावाचे दोन वर्षापूर्वी निधनवीरांची याच्या भावाचे दोन वर्षापूर्वीच निधन झाले आहे. आता वीरांची याच्या जाण्याने खापले कुटुंबियांचा आधारच गेला आहे. एकुलत्या एक वीरांचीच्या जाण्याने खापले कुटुंबियांवर दु:खाचा जणू डोंगरच कोसळला आहे.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी