मुंबके येथे आज रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST2021-06-27T04:21:01+5:302021-06-27T04:21:01+5:30

खेड : तालुक्यातील मुंबके येथे २७ जून रोजी जिल्हा परिषद उर्दू शाळेत खाडीपट्टा वेल्फेअर असोसिएशन व ग्रामीण क्रिकेट कौन्सिल ...

Blood donation camp at Mumbai today | मुंबके येथे आज रक्तदान शिबिर

मुंबके येथे आज रक्तदान शिबिर

खेड : तालुक्यातील मुंबके येथे २७ जून रोजी जिल्हा परिषद उर्दू शाळेत खाडीपट्टा वेल्फेअर असोसिएशन व ग्रामीण क्रिकेट कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कोरोनाने सर्वत्र हाहाकार उडवला असून, मोठ्या संख्येने नागरिक रुग्णालयात उपचार घेत आहेत. या परिस्थितीत रक्ताची टंचाई भासून कोणाचा जीव जाऊ नये म्हणून विविध सामाजिक संस्था रक्तदान करण्याचे आवाहन करत आहेत. तालुक्यातील खाडीपट्टा वेल्फेअर असोसिएशन व ग्रामीण क्रिकेट कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने २७ रोजी मुंबके गावातील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत हे रक्तदान शिबिर होणार आहे. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी दाऊद दुदुके, बुरहान टांके, वसीम फकी, रहीम सहिबोले यांच्यासह अनेक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. या शिबिरात खाडीपट्ट्यातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Web Title: Blood donation camp at Mumbai today