मयेकर महाविद्यालयात रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:31 IST2021-03-31T04:31:42+5:302021-03-31T04:31:42+5:30
जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय कॅडेट ...

मयेकर महाविद्यालयात रक्तदान शिबिर
जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय कॅडेट क्राॅप्स विभाग आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने चाफे येथे महाविद्यालयात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात परिसरातील ३३ तरुणांनी रक्तदान केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मयेकर महाविद्यालयात विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात आजी-माजी विद्यार्थी असलेल्या ३३ जणांनी रक्तदान केले. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे डॉ. राहुल पवार, जनसंपर्क अधिकारी सावंत, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी व्ही. पी. पावरा, अधिपरिचारक डी. एस. कांबळे, रक्तपेढी परिचर पी. एस. अंभोरे व एस. सी. वाडेकर उपस्थित होते.
शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील उर्फ बंधू मयेकर, उपाध्यक्ष नंदकुमार साळवी, सचिव रोहित मयेकर, खजिनदार ऋषिकेश मयेकर, संचालक सुरेंद्र मचिवले, प्रभारी प्राचार्या स्नेहा पालये, सर्व प्राध्यापकांनी रक्तदात्यांचे खास अभिनंदन केले.