गुहागरमध्ये रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:32 IST2021-04-22T04:32:01+5:302021-04-22T04:32:01+5:30
असगोली : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुहागरमध्ये घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोरोनाचे संकट असतानाही केवळ ...

गुहागरमध्ये रक्तदान शिबिर
असगोली : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुहागरमध्ये घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद
दिला.
कोरोनाचे संकट असतानाही केवळ राष्ट्रहीत जोपासत ज्या रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले, त्या सर्वांचे तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी आभार मानले.
जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव आणि उपजिल्हाध्यक्ष पद्माकर आरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पडले.
या शिबिरात २५ जणांनी रक्तदान केले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी राजेंद्र आरेकर, पद्माकर आरेकर, मंदार कचरेकर, श्रीधर बागकर, सुजाता बागकर, स्वाती कचरेकर, तुषार सुर्वे, गौरव वेल्हाळ, संतोष मोरे, अजित बेलवलकर, विनायक आरेकर, रोहित मालप, सौरभ भागडे यांनी मेहनत घेतली.
हे रक्तदान शिबिर रेडक्राॅस रत्नागिरीचे डाॅ. अनिल जोशी व त्यांच्या सहका-यांच्या सहकार्याने घेण्यात आले.