चिपळूण काँग्रेसतर्फे ५ रोजी रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:33 IST2021-04-28T04:33:30+5:302021-04-28T04:33:30+5:30

चिपळूण : रत्नागिरी जिल्हा काँग्रेस, चिपळूण तालुका व शहर काँग्रेसतर्फे अपरांत हॉस्पिटल येथे ५ मे रोजी सकाळी ९ ते ...

Blood donation camp on 5th by Chiplun Congress | चिपळूण काँग्रेसतर्फे ५ रोजी रक्तदान शिबिर

चिपळूण काँग्रेसतर्फे ५ रोजी रक्तदान शिबिर

चिपळूण : रत्नागिरी जिल्हा काँग्रेस, चिपळूण तालुका व शहर काँग्रेसतर्फे अपरांत हॉस्पिटल येथे ५ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून व शासनाच्या नियम आणि अटींना अधीन राहून प्रत्येक जिल्ह्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित केले आहे. रक्तदात्यांनी भरत लब्धे, लियाकत शाह, सुधीर शिंदे यांच्याशी ३ मे राेजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत नावे नोंदवावीत, असे आवाहन शहराध्यक्ष लियाकत शाह यांनी केले आहे.

Web Title: Blood donation camp on 5th by Chiplun Congress