शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

Ratnagiri: रस्त्याचे निकृष्ट काम; गुहागर-विजापूर महामार्गावर ग्रामस्थांचा रास्ता रोको, वाहतूक ठप्प

By संदीप बांद्रे | Updated: June 10, 2024 15:57 IST

रस्त्यावर पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरून सतत अपघात घडत आहेत

चिपळूण : रामपूर- देवखेरकी- नारदखेरकी रस्त्यावर पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरून सतत अपघात घडत आहेत. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांसह भाजपने रामपूर एसटी बस थांब्याजवळ सोमवारी सकाळी रस्ता रोको आंदोलन केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना घेराव घालत जाब विचारला. रास्ता रोको आंदोलनामुळे गुहागर मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतूककोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.रामपूर एसटी बसथांबा ते देवखेरकी, नारदखेरकी पर्यंत पंतप्रधान ग्रामसडक योजनेकडून रस्ता १२ किलोमीटर अंतरावर दगड माती टाकून रस्ता तयार करण्यात आला. मात्र आता पावसाळा सुरु झाल्याने रस्ता संपूर्ण चिखलमय बनला होता. त्यामुळे या मार्गावर अनेक वाहनांचे अपघात झाले. हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला. याविषयी गंभीरपणे दखल घेत भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थांनी अचानक सोमवारी सकाळी रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे गुहागर मार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती.कोणत्याही स्थितीत रस्त्यावर ग्रीट व मोठी खडी टाकून रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने, कंत्राटदाराने तयार करण्याची मागणी केली. या मागणीसाठी रामपूर - नारदखरकी येथील ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलनाला बसले. याबाबती माहिती पोलिसांना मिळताच चिपळूणचे पोलीस निरीक्षक रवींद्र  शिंदे व सहकारी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता श्री. माने, कंत्राटदार चिपळूणकर हे घटनास्थळी येईपर्यंत आंदोलनकर्ते एका बाजूला थांबले. सार्वजनिक बांधकामचे अभियंता एक वाजता घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी देवखेरकी रस्ता हा मृत्यूचा सापळा झालेला आहे. सर्व आंदोलनकर्त्यांनी नारदखरकी पर्यंत चालत जाऊन रस्त्याची पाहणी करण्यास सांगितले. चार महिने पावसाळ्यात ३ ते ४ गावांनी दळणवळण कसे करायचे, अशा प्रश्नांचा भडिमार  केला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. तसेच या रस्त्याची तातडीने डागडुजी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.यावेळी भाजपच्या उत्तर जिल्हा रत्नागिरी महिला सरचिटणीस निलम गोंधळी, तालुकाध्यक्ष अजित थरवळ, डॉ. विनया नातू, अशोक भडवळकर, देवखेरकी सरपंच नम्रता मोहिते, उपसरपंच गणेश हळदे, सदस्या सुरेखा हळदे, सुधीर हळदे, सौरभ चव्हाण, मनसे गुहागर तालुकाध्यक्ष सुनिल हळदणकर, आदित्य आवटे, आवटेवाडी अध्यक्ष अजय आवटे, डॉ. मनोज रावराणे, गणेश चव्हाण आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गroad transportरस्ते वाहतूकagitationआंदोलन