शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

महाविकास आघाडीचा निषेध करत भाजपचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 16:50 IST

रत्नागिरी : उद्धवा अजब तुझे सरकार, स्थगितीसम्राट ठाकरे सरकारचा धिक्कार असो, नारीशक्तीच्या सन्मानासाठी भाजप मैदानात, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या शासनाचा ...

ठळक मुद्देमहाविकास आघाडीचा निषेध करत भाजपचे धरणे आंदोलनखासदार नीलेश राणे यांची ठाकरे सरकारवर घणाघाती टीका

रत्नागिरी : उद्धवा अजब तुझे सरकार, स्थगितीसम्राट ठाकरे सरकारचा धिक्कार असो, नारीशक्तीच्या सन्मानासाठी भाजप मैदानात, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या शासनाचा धिक्कार, नवीन प्रकल्पांना विरोध करणाऱ्या सरकारचा निषेध अशा घोषणा देत भाजपने मंगळवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांसमोर भाजपतर्फे धरणे आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला.महाआघाडी शासन येऊन तीन महिने होऊन गेले मात्र अद्यापही शासन सक्रीय आहे असे जाणवत नाही केवळ पूर्वीच्या लोकाभिमुख सरकारच्या कामांना स्थगिती देणे आणि दोन पक्षांना खोळंबत राहणे, एवढेच काम होताना दिसते. जलयुक्त शिवार ही शेतकऱ्यांना वरदान ठरलेली योजना केवळ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्रेय मिळते म्हणून बंद करण्यात येत आहे, हे दुदैर्वी गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी अ‍ॅड. दिपक पटवर्धन यांनी व्यक्त केली.

शेतकरी कर्जमुक्त नाही, कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. जनतेने केलेल्या अपेक्षा व आश्वासनांचा ताळमेळ बसला नाही. म्हणुन आज जिल्ह्यात सर्वत्र आंदोलन सुरू असल्याचे यावेळी अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.माजी खासदार नीलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली. ज्या रत्नागिरीने शिवसेनेला भरभरून दिले, त्या रत्नागिरीत येऊन मुख्यमंत्री ठाकरेंनी काहीही दिले नाही. कोकणी जनता धनुष्य-बाणावरच शिक्का मारणार हे त्यांनी गृहित धरले आहे. पण आता वातावरण पेटले आहे. त्यांचा ढोंगीपणा, दिखाऊपणा रत्नागिरीकर जनता किती दिवस सहन करणार? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. रत्नागिरी दौऱ्यात ठाकरेंनी नाणारबद्दल चकार शब्द काढला नसल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :BJPभाजपाRatnagiriरत्नागिरी