मंदिर उघडण्यासाठी भाजपचे गुहागरात आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:32 IST2021-09-03T04:32:29+5:302021-09-03T04:32:29+5:30
असगाेली : मंदिर उघडण्यासाठी गुहागर तालुक्यात भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली गुहागर तालुक्यात ठिकठिकाणी मंदिराबाहेर ...

मंदिर उघडण्यासाठी भाजपचे गुहागरात आंदाेलन
असगाेली : मंदिर उघडण्यासाठी गुहागर तालुक्यात भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली गुहागर तालुक्यात ठिकठिकाणी मंदिराबाहेर शंखनाद, घंटानाद करून मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
कोरोनामुळे महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. कालांतराने हॉटेल, बार, दुकाने, अन्य व्यवसाय हे अटी व शर्ती लागू करून सुरू करण्यात आले. परंतु, मंदिरे खुली करण्यासाठी कोणतीही नियमावली जाहीर करण्यात आलेली नाही. सरकारमध्ये असलेले मंत्री, आमदार, त्यांची मुले खुलेआमपणे मंदिरांमध्ये जाऊन अभिषेक करत आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्यांच्यासाठी मंदिरे खुली केली जातात मग सर्वसामान्यांना मंदिरात प्रवेश का दिला जात नाही, असा प्रश्न भाजपचे गुहागर तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्यात लवकरात लवकर मंदिरे खुली करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
गुहागर तालुक्यात भाजप तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, तालुका चिटणीस साईनाथ कळझुणकर, श्रीकांत महाजन, भाजप महिला आघाडी तालुकाध्यक्ष श्रद्धा घाडे, गटनेते उमेश भोसले, युवा मोर्चा शहराध्यक्ष मंदार पालशेतकर आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.