शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

भाजपला अपेक्षेप्रमाणे जागा मिळतील, रामदेवबाबांनी केलं भाकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 14:04 IST

निवडणुकीत भारतीय जनता पक्ष रसातळाला जाईल, असे वक्तव्य काहींनी केले होते. मात्र असे काही होणार नाही

रत्नागिरी : पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल लवकरच समोर येणार आहेत. निवडणुकीत भारतीय जनता पक्ष रसातळाला जाईल, असे वक्तव्य काहींनी केले होते. मात्र असे काही होणार नाही तर भाजपला अपेक्षेप्रमाणे जागा मिळतील. केजरीवाल यांनाही चांगल्या कामाची पावती मिळेल. वास्तविक निवडणुका ही एक परीक्षा आहे. सर्व पक्षांना निवडणुकांच्या माध्यमातून आत्ममूल्यांकन करण्याची संधी असल्याचे प्रतिपादन रामदेवबाबा यांनी केले.महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र (पश्चिम) तर्फे रत्नागिरीत प्रात:कालीन योग शिबिर व प्रांतिक महिला संमेलन आयोजित करण्यात आले असून, त्यासाठी रामदेव बाबा रत्नागिरीत आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत मार्गदर्शन केले.गेली नऊ वर्ष मी ‘नि:पक्ष’ राहून कार्यरत असून, सर्वांचा आदर, सन्मान करीत असल्याचे सांगितले. अकरा वर्षांनंतर रत्नागिरी आलो असून, लोकमान्य टिळक व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना प्रथम अभिवादन केल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनानंतर दोन वर्षांनंतर रत्नागिरीत प्रथम कार्यक्रम होत आहे.गेली ४५ वर्षे मी योग करीत असून, ३० वर्षे लोकांकडून करवून घेत आहे.  २०० कोटी लोक योग करीत आहेत. देश आरोग्यदृष्ट्या शक्तिशाली व विश्वाचे अग्रगण्य राष्ट्र बनावे हा उद्देश आहे. शिक्षण, आरोग्य, आर्थिकदृष्ट्या भारत २०३५ पर्यंत संपन्न व्हावा, यासाठी योगाच्या माध्यामातून आपले प्रयत्न आहेत, असे त्यांनी सांगितले.महिला दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक कुटुंबात असाध्य व्याधींनी ग्रस्त रुग्ण आहेत.  नागरिकांना रोगमुक्त, नाशमुक्त, तंटामुक्त पाहण्याची इच्छा असून, योगाच्या माध्यमातून शक्य असल्याचे रामदेव बाबा यांनी यावेळी सांगितले.

उदय सामंत यांच्यामुळे जिल्ह्याचा भाग्योदय

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे चांगले काम करीत असून, रत्नागिरी जिल्ह्यात उदय सामंत यांच्यामुळे भाग्योदय होत आहे. केंद्रात चांगले काम सुरु असल्याने देशाच्या विकासासाठी सर्वांचे नक्कीच चांगले प्रयत्न आहेत. उदय सामंत राष्ट्र निष्ठा व योग निष्ठा प्रेमी असल्याचे सांगून त्यांचे वडील उद्योजक अण्णा सामंत यांनाही आपणासंबंधी आनंद, प्रेम असल्याचे रामदेवबाबा यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBJPभाजपाElectionनिवडणूक