शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांकडे विकासाची दृष्टी आणि निधीसाठी हट्ट हवा : प्रमोद जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 17:27 IST

कोकणातील नद्यांचा गाळ उपसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. केवळ ९ ते १० कोटी रूपयाने भागणार नाही. ते कोणाच्या खिशात जातील तेही समजणार नाही.

चिपळूण : कोकणातील नद्यांचा गाळ उपसा केला तर पूर्वीचे वैभव पुन्हा उभे राहील आणि विकालाही गती मिळेल. मात्र, त्यासाठी कोकणच्या नेत्यांकडे विकासाची दृष्टी हवी. निधी मागण्यासाठी हट्टही करायला हवा. तरच हा प्रश्न सुटू शकतो असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले.वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा करण्यासाठी व लाल, निळी पूररेषा रद्द करण्यासाठी चिपळूण बचाव समितीच्या माध्यमातून साखळी उपोषण सुरू आहे. गेल्या सहा दिवसापासून सुरू असलेल्या या उपोषणाला आज, शनिवारी प्रमोद जठार यांनी भेट देत येथील नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या.प्रमोद जठार म्हणाले की, चिपळूण बचाव समितीने लोकहिताचे काम हाती घेतले आहे. हा प्रश्न तडीस गेल्यास आपोआपच अन्य प्रश्नही सुटणार आहेत. त्यामुळे हा मुद्दा शेवटपर्यंत धरून ठेवणे आवश्यक आहे. कोकणातील विकासाची उंची समुद्राच्या खोलीत लपली आहे. ती खोली गाठल्याशिवाय यश नाही. त्यासाठी कोकणच्या नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. निधी मिळवण्यासाठी हट्ट करायला हवा, तरच मिळणार आहे. अन्यथा सहजासहजी निधी मिळत नाही, हा आपला अनुभव आहे, असे ते म्हणाले.मोठ्या निधीची गरजसर्रासपणे कोकणचा माणूस कोणाकडे मदत मागत नाही किंवा मदतीची प्रतीक्षा करत बसत नाही. आलेल्या परिस्थितीला तोंड देणे हेच कोकणी माणसाला माहिती आहे. परंतु, हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. केवळ ९ ते १० कोटी रूपयाने भागणार नाही. ते कोणाच्या खिशात जातील तेही समजणार नाही. आपल्याला या प्रश्नी कोणतेही राजकारण करायचे नाही किंवा त्यासाठी आलेलो नाही, असे जठार यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्या सोबत नगरसेवक विजय चितळे, निशिकांत भोजने, शहराध्यक्ष आशिष खातू उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाriverनदीStrikeसंप