शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजप पैशाचा वापर करून आमदार फोडू शकेल, मात्र..; शिवसेना आमदाराचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 13:52 IST

शिवसेनेचे कोकणवासीयांसोबत अतूट नाते आहे. हे नाते कधीच तुटणार नाही.

आचरा : शिवसेनेने कोकणला भरभरून दिले आहे. त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे कोकणवासीयांसोबत अतूट नाते आहे. हे नाते कधीच तुटणार नाही. शिंदे गटाच्या मागे पूर्णतः भाजप आहे. भाजप पक्ष पैशाचा वापर करून आमदार फोडू शकेल. मात्र, सर्वसामान्य जनतेला ते विकत घेऊ शकत नाही, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले.आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या माध्यमातून मालवण तालुक्यातील गोळवण, मसुरे, आचरा, आडवली जिल्हा परिषद मतदारसंघाच्या बैठका रविवारी झाल्या. यावेळी ते बोलत होते.

यावेळी शिवसेना संघटना वाढीसंदर्भात आमदार नाईक यांनी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना मार्गदर्शन केले, विकासकामांची माहिती दिली. याबैठकांना पदाधिकारी, शिवसैनिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.गोळवण येथे उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, महिला तालुकाप्रमुख दीपा शिंदे, कृष्णा आंगणे, भाऊ चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, बी. जी. गावडे, उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, काका गावडे, महिला विभागप्रमुख प्रज्ञा चव्हाण, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, युवासेना विभागप्रमुख राहुल सावंत, अजित पार्टे, अल्पेश निकम, शशांक माने, विजय धामापूरकर उपस्थित होते.मसुरे येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, उपतालुकाप्रमुख छोटू ठाकूर, मर्डे सरपंच संदीप हडकर, विभागप्रमुख राजेश गावकर, उपविभागप्रमुख अमोल वस्त, उपविभागप्रमुख सुहास पेडणेकर, हडी शाखाप्रमुख संतोष अमरे, ग्रामपंचायत सदस्य पपू मुळीक, तर आचरा येथे विभागप्रमुख समीर लब्दे, पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर, उपविभागप्रमुख जगदीश पांगे, अनिल गावकर, नारायण कुबल, उदय दुखडे, श्रीकांत बागवे, राजू नार्वेकर, राजू हिर्लेकर, वायंगणी सरपंच रेडकर, महिला विभागप्रमुख अनुष्का गावकर, आचरा माजी सरपंच शामसुंदर घाडी, श्रीकांत बागवे उपस्थित होते.आडवली येथे उपतालुकाप्रमुख बाबा सावंत, विभागप्रमुख बंडू चव्हाण, संतोष घाडी, दीपक राऊत, रामगड सरपंच विलास घाडीगावकर, अमित फोंडके, अरुण लाड, ओवळीये सरपंच अंबाजी सावंत, शाखाप्रमुख सुनील सावंत, दुलाजी परब, सुभाष धुरी, युवराज मेस्त्री, दीपक किर्लोस्कर, युवासेना विभागप्रमुख बंडू गावडे, आडवली सरपंच संतोष आडवलकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाBJPभाजपा