नगराध्यक्षपदाची माळ भाजपकडे

By Admin | Updated: June 13, 2014 01:34 IST2014-06-13T01:33:19+5:302014-06-13T01:34:24+5:30

देवरूखमध्ये हालचाली : मुदत संपणार असल्याने चर्चा

The BJP is the head of the city | नगराध्यक्षपदाची माळ भाजपकडे

नगराध्यक्षपदाची माळ भाजपकडे

देवरुख : नव्याने नगरपंचायतीची निर्मिती झालेल्या देवरुख नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा पहिला मान सेनेला मिळाला आहे. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची सव्वा वर्षांची मुदत आता संपत आली असून युतीमध्ये यापूर्वी झालेल्या तडजोडीनुार हे पद भाजपला देण्याचे ठरवण्यात आले होते. आता यानुार सव्वा वर्षांच्या टर्मसाठी देवरुखात नगराध्यक्षपदाची माळ भाजपच्या गळ्यात पडणार का? याकडे साऱ्या देवरुखवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
देवरुख ग्रामपंचायतीचे देवरुख नगरपंचायतीत रुपांतर डिसेंबर २०१२ मध्ये तर मार्च २०१३ मध्ये या नगरपंचायतीची पहिली निवडणूक झाली आणि १ एप्रिल रोजी याचा निकाल लागला. पूर्वीच्या ग्रा.पं.मधील सत्ताधाऱ्यांना आणि दिग्गजांना चितपट करत शिवसेना व भाजप युतीने निर्विवाद सत्ता खेचून आणली. नगरपंचायतीच्या या पहिल्याच निवडणुकीत एकूण १७ जागांपैकी १२ जागा युतीने पटकावल्या. यामध्ये सेनेचे ७ तर भाजपचे ५ नगरसेवक आहेत. यामुळे जास्त नगरसेवक त्यांनाच पहिले नगराध्यक्षपद असे ठरवण्यात आले. यानुसार नगरसेविका निलम हेगशेट्य यांना नगराध्यक्षपदाचा बहुमान मिळाला. तसेच देवरुखच्या पहिल्या महिला नगराध्यक्षपदाचा सन्मानही त्यांच्याकडेच जातो तर त्यावेळी उपनगराध्यक्षपद भाजपला देण्यात आले होते. उपनगराध्यक्षपदी भाजपचे निलेश भुरवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यावेळीच सव्वावषार्नंतर पद कोणाला द्यायचे याबाबत ठरविण्यात आले होते. त्यानुसार पुढील सव्वा वर्षात भाजपला हे पद देण्याचे ठरविण्यात आले.
नगराध्यक्षपदाची माळ भाजपच्या गळ्यात पडते का यागडे देवरुखवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. या अलिखित ठरावानुार विद्यमानांना राजीनामा द्यावा लागणार असून त्यानंतर ही निवड जुलै महिन्यात शक्य होवू शकेल.
दोन पक्षांच्या अंतर्गत चर्चेच्या माहितीनुसार भाजपच्या गटातून नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत स्वाती राजवाडे व मेधा बेर्डे यांच्या नावाची चर्चा ऐकायला मिळत आहे. आता या निवडीकडे देवरुखवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजप पदाबाबत ्आशावादी आहे.(प्रतिनिधी)
 

Web Title: The BJP is the head of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.