भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वामन पवार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:30 IST2021-04-06T04:30:24+5:302021-04-06T04:30:24+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वामन पवार (७२) यांचे अल्पशा आजाराने साेमवारी सकाळी पुणे येथे निधन ...

BJP district vice president Waman Pawar passes away | भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वामन पवार यांचे निधन

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वामन पवार यांचे निधन

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वामन पवार (७२) यांचे अल्पशा आजाराने साेमवारी सकाळी पुणे येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने रत्नागिरी जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

पोफळीचे सुपुत्र वामन पवार यांनी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम केले. त्यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे पक्षाने त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर पवार यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला हाेता. त्यानंतर ते भाजपच्या रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष पदावर काम करत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना पित्ताशयाचा त्रास जाणवू लागला हाेता. मुंबईतील एका रुग्णालयामध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र, लगेच त्यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. सुरुवातीला काही महिने मुंबई तर त्यानंतर पुणे येथील रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच साेमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत माळवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: BJP district vice president Waman Pawar passes away