पंतप्रधान मोदींच्या वाढदिनी भाजपतर्फे रत्नागिरीत फळे, धान्यवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:34 IST2021-09-18T04:34:05+5:302021-09-18T04:34:05+5:30
रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे देशात सेवासप्ताह आयोजित केला आहे. याअंतर्गत रत्नागिरी शहर व तालुका भाजपतर्फे ...

पंतप्रधान मोदींच्या वाढदिनी भाजपतर्फे रत्नागिरीत फळे, धान्यवाटप
रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे देशात सेवासप्ताह आयोजित केला आहे. याअंतर्गत रत्नागिरी शहर व तालुका भाजपतर्फे जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच निरीक्षणगृह संस्थेमध्ये धान्याचे वाटप करण्यात आले.
जिल्हा रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सफरचंद व केळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी रुग्णालयातील कर्मचारी, परिचारिकांचे सहकार्य लाभले. भाजपचे शहराध्यक्ष सचिन करमकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, जिल्हा सचिव सचिन वहाळकर, राजेश सावंत, राजेंद्र पटवर्धन, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या जठार, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, नगरसेविका मानसी करमरकर, सुप्रिया रसाळ, राजश्री शिवलकर, प्राजक्ता रुमडे, पमू पाटील, ययाती शिवलकर, राजेंद्र पटवर्धन, बाबू सुर्वे, दादा ढेकणे, प्रवीण देसाई, राजू भाटलेकर, प्रशांत डिंगणकर, प्रवीण रुमडे, भाई जठार, पावसकर, आग्रे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.