शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या बैठकीत मित्रपक्षाला अल्टिमेटम, भाजप नेत्यांवरील टीका टाळण्याचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 17:37 IST

मित्रपक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य नेते यांच्या संदर्भाने टीका टाळावी, भाजपच्या सर्व नेत्यांचा मान राखला जावा. तसेच मुख्यमंत्र्यांविरोधातील टीका ही भाजप कार्यकर्त्यांना जिव्हारी लागली आहे, हे असेच सुरू राहिल्यास युतीत ताळमेळ राखणे अवघड जाईल, याची नोंद मित्रपक्षाने घ्यावी. यासाठी शिवसेना नेत्यांशी संपर्क साधून त्यांना तसे सांगण्यात यावे, असा निर्णय रत्नागिरीत झालेल्या भाजपच्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्दे भाजप नेत्यांवरील टीका टाळण्याचा सल्लाअन्यथा युतीत ताळमेळ राखणे अवघड

रत्नागिरी : मित्रपक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य नेते यांच्या संदर्भाने टीका टाळावी, भाजपच्या सर्व नेत्यांचा मान राखला जावा. तसेच मुख्यमंत्र्यांविरोधातील टीका ही भाजप कार्यकर्त्यांना जिव्हारी लागली आहे, हे असेच सुरू राहिल्यास युतीत ताळमेळ राखणे अवघड जाईल, याची नोंद मित्रपक्षाने घ्यावी. यासाठी शिवसेना नेत्यांशी संपर्क साधून त्यांना तसे सांगण्यात यावे, असा निर्णय रत्नागिरीत झालेल्या भाजपच्या बैठकीत घेण्यात आला.रत्नागिरीत भाजपचे जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, सरचिटणीस यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले. भाजप संघटनेचे काम आणि निवडणूक याची सांगड घालत प्रत्येक तालुक्याने आपली निवडणूक यंत्रणा सज्ज करावी, असे पटवर्धन म्हणाले. विधानसभा निवडणुकीत भाजप नेतृत्वाला अपेक्षित काम सर्वांनी करावे, असे आवाहन केले.युती झाल्यास भाजपला पाच मतदार संघातील किमान २ मतदार संघ मिळावेत, अशी आग्रही मागणी यावेळी तालुकाध्यक्षांनी केली. सद्यस्थितीत जिल्हा कार्यकारिणी अगर पदाधिकारी यांच्या नियुक्त्या प्रलंबित असल्याने संघटनेसंदर्भात द्यावयाचे निर्देश जिल्हाध्यक्ष म्हणून अ‍ॅड.़ पटवर्धन हे व्यक्तिगतरित्या सर्व तालुकाध्यक्षांना देणार आहेत.सर्व तालुकाध्यक्ष व सरचिटणीस यांनी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम अधिक जोमाने करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

या बैठकीला संगमेश्वर तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, रत्नागिरी तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, लांजा तालुकाध्यक्ष यशवंत वाकडे, चिपळूण तालुकाध्यक्ष सतीश मोरे, गुहागरचे सरचिटणीस नीलेश सुर्वे, चिपळूणच्या मनिषा निमकर, राजापूरचे अभिजीत गुरव, खेडचे विनोद चाळके, रत्नागिरीचे प्रशांत डिंगणकर उपस्थित होते.पाचही युतीचे उमेदवार विजयी होतीलभाजप व शिवसेना यांची युती झाल्यास संपूर्ण जिल्ह्यात भाजप संघटना युतीच्या उमेदवारांसाठी काम करेल आणि भाजपप्रणित सरकार पुन्हा स्थापन करण्यासाठी रत्नागिरीतून पाचही युतीचे आमदार विजयी होतील, असा प्रयत्न करण्याचे आवाहन अ‍ॅड. पटवर्धन यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

टॅग्स :BJPभाजपाRatnagiriरत्नागिरी