नाट्यमहोत्सवास चिपळूणकरांचा मोठा प्रतिसाद

By Admin | Updated: April 27, 2015 00:11 IST2015-04-26T22:02:40+5:302015-04-27T00:11:25+5:30

खल्वायनचा प्रयोग : संगीत नाटकातील नाट्यपदे, विशुद्ध विनोद, देखणे नेपथ्य भावले

Big response for the Natya Mahotsav Chiplunkar | नाट्यमहोत्सवास चिपळूणकरांचा मोठा प्रतिसाद

नाट्यमहोत्सवास चिपळूणकरांचा मोठा प्रतिसाद

रत्नागिरी : खल्वायन संस्थेने सलग दुसऱ्या वर्षी चिपळूण येथे आयोजित केलेल्या संगीत नाट्यमहोत्सवाला नाट्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संगीत संशयकल्लोळ , प्रीतिसंगमङ्कनाटकांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले.
दोन्ही संगीत नाटकांतील नाट्यपदे, विशुद्ध विनोद, देखणे नेपथ्य, नेत्रदीपक प्रकाशयोजना, ट्रीक सिन्स यामुळे रसिकांनी नाटकांचा मनमुराद आनंद लुटला.ङ्कमराठीतील विनोदप्रधान नाटकांतील सं. संशयकल्लोळ हे नाटक नाट्याचार्य गो. ब. देवल यांनी लिहिल होते. गेली ९९ वर्षे हे नाटक रसिकांमध्ये लोकप्रिय झाले आहे.
खल्वायनचेङ्कमनोहर जोशी यांचे दिग्दर्शन नाटकाला लाभले असून कलाकारांनीही प्रचंड मेहनतीने भूमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. फटकळ तोंडाची ठसकेबाज कृतिका शमिका जोशी, अल्लड, थट्टेखोर रेवती श्वेता जोगळेकर, संशयी बेरक्या ङ्खफाल्गुनराव ङ्कमनोहर जोशी, उताविळ पण एकनिष्ठ अश्विनशेठ अजिंंक्य पोंक्षे, विनोदी, इरसाल भादव्या विजय उर्फ बापू जोशी, अश्विनचा मित्र वैशाखशेठ गणेश जोशी, दमदार गायन करून साधूची व्यक्तीरेखा साकारणारा अभिजित भट यांनी आपापल्या भूमिका उत्कृष्टरित्या सादर केल्या आहेत.
निखिल जोशी, मंजिरी जोशी, प्राजक्ता जोशी, देवश्री शहाणे या कलाकारांनी छोट्या पण भूमिकेला न्याय दिला आहे.
आचार्य अत्रे लिखित संगीत प्रीतिसंगम नाटकामध्ये उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले आहे. खाष्ट उमाकाकू शमिका जोशी, पाताळयंत्री खोटारडी चंद्रा दीप्ती कानविंंदे, आईवेडा व नंतरचा कणखर अंबादास अजिंंक्य पोंक्षे, सोशिक समंजस सखू श्वेता जोगळेकर, दिंडींचे प्रमुख गोविंंद बुवा आनंद प्रभुदेसाई यांनी व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.
नेपथ्य व रंगभूषा दादा लोगडे यांनी केली. रामदास ङ्कमोरे यांचे पार्श्वसंगीत, मंगेश लाकडे, गोपीकांत भुवड यांची प्रकाशयोजना उठावदार झाली. हेरंब जोगळेकर, ङ्कमधुसूदन लेले, प्रथमेश तारळकर यांची संगीत साथ लाभली. समारोपावेळी लोकमान्य टिळक स्मारकाच्या प्रकाश देशपांडे यांनी खल्वायनच्या कलाकारांचे कौतुक केले. पुढील वर्षीही नाट्यमहोत्सव सादर करावा, असे आवाहन केले.
चिपळूणमधीलङ्कया संगीतनाट्य महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी शरद तांबे, स्मिता करंदीकर, राहुल साडविलकर, आनंद लिमये, सुनील जोशी, बंडा जोशी, समीर शेटे, नाना जोशी यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)


खल्वायनच्या संगीत नाटकांची मेजवानी चिपळुणकरांना भावली.
नाट्यसंगीत उत्तम, संशयकल्लोळ मधील भूमिका लक्षणीय.
महोत्सवाच्या यशश्वीतेसाठी सर्वांचे सहकार्य.
छोट्या भूमिकांनी सादरीकरणात आणली रंगत.

Web Title: Big response for the Natya Mahotsav Chiplunkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.