‘सन्मानधना’लाही लागलाय भुंगा...

By Admin | Updated: August 17, 2014 00:40 IST2014-08-17T00:29:25+5:302014-08-17T00:40:28+5:30

एजंटांचा सुळसुळाट : ९० रुपयांऐवजी उकळले जाताहेत बाराशे रुपये

Bhunga used to 'honor' | ‘सन्मानधना’लाही लागलाय भुंगा...

‘सन्मानधना’लाही लागलाय भुंगा...

रत्नागिरी : राज्य शासनाच्या चांगल्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचताना मूळ योजनेला सुरूंग लावणारे एजंट प्रत्येक क्षेत्रात निर्माण झाले आहेत. या टक्केवारीच्या बजबजपुरीत ५५ वर्षे वय पूर्ण झालेल्या मोलकरणींना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या १० हजार रुपये सन्मानधनालाही एजंटांचा भूंगा लागला आहे. अवघे ९० रुपये भरून नोंदणीची अट असताना अशा लाभधारक मोलकरीण म्हणून काम केलेल्या महिलांकडून एजंट १२०० रुपये उकळत असल्याच्या घटना पुढे येत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
अत्यंत हलाखीचे जिवन जगताना अनेक महिला धूणीभांडी करून आपला चरितार्थ चालवितात. त्याद्वारे संसाराचा गाडा कसाबसा ओढतात. अशा संसारासाठी झिजलेल्या ज्येष्ठ मोलकरणींना दहा हजार रुपये सन्मानधन देण्याची योजना महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळाने सुरू केली आहे. असंघटीत क्षेत्रातील कामगारांना काहीअंशी मदत करता यावी हा त्यामागे उद्देश आहे.
या मंडळात नोंदणीसाठी वयाचा पुरावा, रेशनकार्डची सत्यप्रत आदी कागदपत्र सादर करावी लागतात. कागदपत्रांची पुर्तता करून ९० रुपये शुल्क भरून सभासद व्हावे लागते. मात्र या अशिक्षित महिलांच्या भोळेपणाचा फायदा उठवत काही समाजसेवी संस्था भूछत्राप्रमाणे उगवल्या आहेत.
फायद्याच्या नावाखाली एजंटगिरी करणाऱ्या संस्थांकडून सभासदामागे मिळणाऱ्या सन्मानधनाच्या १० टक्के म्हणजे १२०० रुपये रक्कम कमिशन म्हणून उकळली जात आहे. रत्नागिरीत काही संस्थांनी आपली कार्यालये उघडून दुकानेच थाटली आहेत. मात्र गोरगरिबांना मिळणाऱ्या त्यांच्या हक्काच्या पैशांवरही डल्ला मारणाऱ्या अशा संस्थांवर, एजंटसवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी घरेलु कामगारांनी केली आहे. (प्रतिनिधी)
४मूळ योजनेला सुरूंग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या एजंटवर कारवाई करा अशी घरेलू कामगारांनी केली आहे
४काही ठिकाणी निरलस सेवा करण्याचा प्रयत्न तर अन्यत्र मात्र फसवेगिरीचीच उदाहरणे
४ज्येष्ठ मोलकरीणतार्इंसाठी सर्वसमावेष धोरण राबवा.



निरलस सेवा देणारेही...
या एजंटगिरी करणाऱ्या संस्थाव्यतिरिक्त काहीजण ९० रुपये भरून मोलकरणींना त्यांचे हक्काचे १० हजार सन्मानधन मिळवून देण्यासाठीही कार्यरत आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयात अशा लाभधारक ज्येष्ठ मोलकरणींना ९० रुपये भरून घेत त्यांचे हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी मदत केली जात आहे. अन्य काही व्यक्तीही याच निरलस भावनेतून काम करीत आहेत. मात्र ज्या संस्था अशा लाभधारकांकडून कमिशन उकळत आहेत. त्यांच्यावर तातडीने कारवाई आवश्यक आहे.

Web Title: Bhunga used to 'honor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.