कुरणे - बाैद्धवाडी रस्त्याचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:32 IST2021-04-02T04:32:21+5:302021-04-02T04:32:21+5:30

लांजा तालुक्यातील कुरणे - बाैद्धवाडी येथील रस्त्याच्या कामाचे सरपंच संजना पड्ये यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. लाेकमत न्यूज नेटवर्क ...

Bhumipujan of Kurne - Baidhwadi road | कुरणे - बाैद्धवाडी रस्त्याचे भूमिपूजन

कुरणे - बाैद्धवाडी रस्त्याचे भूमिपूजन

लांजा तालुक्यातील कुरणे - बाैद्धवाडी येथील रस्त्याच्या कामाचे सरपंच संजना पड्ये यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

लाेकमत न्यूज नेटवर्क

लांजा : तालुक्यातील कुरणे - बौद्धवाडी येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सरपंच संजना पड्ये यांच्या हस्ते करण्यात आले. या कामामुळे स्मशानभूमीकडे जाताना हाेणारी गैरसाेय दूर झाली आहे.

गेली अनेक वर्षे कुरणे - बौद्धवाडी येथील पायवाटेने अंत्यविधीसाठी जाताना अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही गैरसाेय दूर करण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे रस्त्याची मागणी केली होती. ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगातून या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. या रस्ता कामाचे भूमिपूजन सरपंच संजना पड्ये, उपसरपंच मोहन घडशी, ग्रामपंचायत सदस्य अनंत दाभोळकर, मानसी कांबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी त्रिवेणी बौद्ध मंडळाचे अध्यक्ष महेंद्र कांबळे, मुंबई मंडळाचे अध्यक्ष अशोक कांबळे, सचिव आनंदा कांबळे, शंकर कासारे, दत्ताराम कांबळे, दिलीप कांबळे, सुनील कासारे, बबन कांबळे, संतोष कांबळे व ग्रामस्थ उपस्थित हाेते.

Web Title: Bhumipujan of Kurne - Baidhwadi road