दोणवली आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:18 IST2021-03-30T04:18:57+5:302021-03-30T04:18:57+5:30
चिपळूण : तालुक्यातील कापरे प्राथमिक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दोणवली येथे उपकेंद्र व्हावे, अशी मागणी सातत्याने ग्रामस्थांमधून केली जात होती. ...

दोणवली आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन
चिपळूण : तालुक्यातील कापरे प्राथमिक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दोणवली येथे उपकेंद्र व्हावे, अशी मागणी सातत्याने ग्रामस्थांमधून केली जात होती. अखेर त्यास यश आले आहे. उपकेंद्रासाठी आवश्यक जागा उपलब्ध झाल्याने निधी मंजूर झाला. मंजूर झालेल्या उपकेंद्र इमारतीचे भूमिपूजन जिल्हा सहकार बोर्डाचे माजी अध्यक्ष व दोणवलीचे माजी सरपंच डॉ.मधुकर चांदीवडे यांच्या हस्ते करण्यात आले.
तालुक्यातील दोणवली येथील ग्रामस्थ व महिलांना विविध आरोग्यविषयक सेवा-सुविधांसाठी कापरे प्राथमिक आरोग्य जावे लागत होते. त्यामुळे गावातच उपकेंद्र होण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात होती. मात्र, त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध होत नव्हती. सरपंच डॉ.मंदार चांदीवडे यांनी सरपंच म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर रखडलेली कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केले. उपकेंद्रासाठी मोफत जागा मिळण्यासाठी त्यांनी ग्रामस्थांशी नियमित संवाद ठेवला. यातून प्रमोदिनी गुरव व प्रेमिला मारुती गुरव या दोन्ही संख्या बहिणींनी रस्त्यालगत असलेली ५ गुंठे जागा उपकेंद्रासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली.
कार्यक्रमाला माजी सरपंच सुशीला पवार, जाफर कवारे, संताजी कदम, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष कदम, उपसरपंच हेमंत परचुरे, सदस्य गणेश लाड, अश्विनी भुवड, जरिना डबीर, मानसी पवार, सोसायटी चेअरमन अशोक चव्हाण, मुंबई मंडळाचे अध्यक्ष अप्पा चव्हाण, प्रकाश चव्हाण उपस्थित होते.