भडगाव-खोंडे रस्ता कामाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:18 IST2021-03-30T04:18:55+5:302021-03-30T04:18:55+5:30
खेड : तालुक्यातील भडगाव-खोंडे रस्ता कामाचे भूमिपूजन आमदार योगेश कदम यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या रस्ता कामासाठी आमदार ...

भडगाव-खोंडे रस्ता कामाचे भूमिपूजन
खेड : तालुक्यातील भडगाव-खोंडे रस्ता कामाचे भूमिपूजन आमदार योगेश कदम यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या रस्ता कामासाठी आमदार कदम यांच्या प्रयत्नाने १३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
भडगाव-खोंडे येथे ज्ञानदीप विद्यामंदिर, आयसीएस महाविद्यालय असून, या ठिकाणी सतत रहदारी सुरू असते. या पार्श्वभूमीवर भडगाव-खोंडे रस्त्यासाठी मंजूर झालेल्या निधीमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय मात्र दूर होणार आहे. यावेळी पंचायत समिती सभापती मानसी जगदाळे, जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण कदम, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, माजी सभापती सुरेश उसरे, विजय कदम, जीवन आंब्रे, अपर्णा नक्षे, अशोक जोगळे, गणपत येसरे, शशिकांत जोगळे, विष्णू जोगळे, संतोष घाणेकर, मधुकर पवार, कुलदीप पवार, सरपंच प्रमोद बैकर, उपसरपंच महेंद्र सावंत उपस्थित होते.