शृंगारपूर गावात विविध कामांची भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST2021-09-14T04:37:23+5:302021-09-14T04:37:23+5:30
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर गावातील विविध विकास कामांची भूमिपूजन चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम व माजी आमदार सदानंद चव्हाण ...

शृंगारपूर गावात विविध कामांची भूमिपूजन
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर गावातील विविध विकास कामांची भूमिपूजन चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम व माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते नुकतीच करण्यात आली.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, माजी उपसभापती दिलीप सावंत, तसेच राष्ट्रवादी तालुका सचिव, राजेंद्र पोमेंडकर, विनोद म्हस्के आदी उपस्थित होते.
आमदार शेखर निकम यांनी मंजूर केलेल्या या विविध कामाचा शुभारंभ करण्यात आला. यात वरची वाडी ते गणेश विसर्जन घाट रस्ता डांबरीकरण करणे (५ लाख), जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कापाचीवाडी अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे (१० लाख), तर तिसरे काम प्रचितगडाकडे जाणारा रस्ता तयार करणे (१० लाख), याबरोबरच प्रचितगडाकडे जाणाऱ्या लोखंडी पायऱ्या तयार करणे (१० लाख) अशा क वर्ग पर्यटन स्थळ अंतर्गत ३५ लाखांच्या विकास कामाची भूमिपूजन आमदार शेखर निकम तसेच माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम व महाविकास आघाडीचे आभार मानले.
यावेळी सरपंच श्रेया पवार, राजा म्हस्के, दीपक म्हस्के, अविनाश जाधव, रामचंद्र जाधव, गजानन चव्हाण, अनिल चव्हाण, गजानन म्हस्के, विलास चव्हाण, भिकाजी म्हस्के, रामचंद्र चव्हाण, प्रमोद म्हस्के, विनोद पवार, विजय गायकवाड, रामचंद्र जाधव, राजू जाधव, हरिश्चंद्र म्हस्के, सुभेदार जितेंद्र तावडे ,अनिल घोरपडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
130921\20210913_153021.jpg
भूमिपूजन करताना आमदार शेखर निकम