शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील मजगावमधील भोंदूबाबाला एक वर्ष कारावास, घर शुद्धीकरणाच्या नावाखाली केले होते दागिने लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 18:49 IST

हा प्रकार २८ एप्रिल ते १० ऑक्टाेबर २०१६ या कालावधीत घडला हाेता

रत्नागिरी : घरातील माणसे वारंवार आजारी पडतात. औषधोपचार करूनही काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे तुम्हाला घराचे शुद्धीकरण करावे लागेल, असे सांगून जादूटोणा करून घरातील महिलांचे सुमारे दीड लाख रुपयांचे दागिने घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार घडला हाेता. हा प्रकार २८ एप्रिल ते १० ऑक्टाेबर २०१६ या कालावधीत घडला हाेता. याप्रकरणी भोंदूबाबा मुश्ताक इसा काझी (५२, रा. मजगाव, रत्नागिरी) याला येथील न्यायालयाने १ वर्ष कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.रत्नागिरी तालुक्यातील भावेआडम येथे राहणारे विलास शंकर तांबे (५२) यांनी फिर्याद दिली हाेती. घरातील काही व्यक्ती सातत्याने आजारी पडत होत्या. औषधोपचार केल्यानंतरही त्यांना अपेक्षित गुण येत नव्हता. याच संधीचा फायदा मजगाव येथील भोंदूबाबा मुश्ताक काझी याने उठवला होता. घरातील माहिती घेतल्यानंतर तुम्हाला घराचे शुद्धीकरण करावे लागेल, असे तांबे यांना सांगितले होते. त्यानुसार त्याने घरात येऊन घरातील महिलांचे वापरातील दागिन्यांचेही शुद्धीकरण करावे लागेल, असे सांगितले.सुमारे दीड लाख रुपये किमतीची ४ मंगळसूत्रे, ४ चेन, २ कानातील कुड्या, साखळी व रोख १ हजार ५०० रुपये घेऊन ताे गेला हाेता. हे दागिने दि. १८ जुलै २०१७ पर्यंत त्याने परत न दिल्याने अखेर विलास तांबे यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करून ९ ऑगस्ट २०१७ राेजी मुश्ताक काझी याला अटक करण्यात आली होती.

या खटल्याची सुनावणी शनिवारी (१७ मार्च) पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आरोपी मुश्ताक काझी याला भादंवि कलम ४२० अन्वये १ वर्ष साधा कारावास व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास ४ दिवस साधा कारावास, जादूटोणा अधिनियम २०१३ चे कलम ३ अन्वये १ वर्ष साधा कारावास व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास ४ दिवस साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली.ग्रामीण पोलिसचे निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस हेडकाॅन्स्टेबल एस. एल. पेंढामकर यांनी गुन्ह्याचा तपास केला होता. पैरवी अधिकारी सहायक पाेलिस निरीक्षक डी. बी. सूर्य, सहायक पोलिस उपनिरिक्षक अनंत जाधव, पोलिस हवालदार संजीवनी मोरे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCourtन्यायालय