पक्षकार्य करेल तोच पदावर राहणार : भास्कर जाधव

By Admin | Updated: July 6, 2015 00:25 IST2015-07-05T21:45:30+5:302015-07-06T00:25:05+5:30

कार्यकर्ता मेळावा : माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक पारदळे राष्ट्रवादीत दाखल

Bhaskar Jadhav will be in office for the party | पक्षकार्य करेल तोच पदावर राहणार : भास्कर जाधव

पक्षकार्य करेल तोच पदावर राहणार : भास्कर जाधव

आबलोली : आपल्या पक्षात जुने - नवे वाद नसून जो पक्षकार्य करेल तोच पदावर राहील. सत्ता आली तरी शिस्त बिघडवू नका. कारण सत्ता ही शाश्वत नसते, असे आवाहन गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी केले.
गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले की, पक्षवाढीसाठी कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यासाठी जात - पात न पाहता काम करणाऱ्याला संधी दिली जाईल. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक पारदळे, शाखाप्रमुख शंकर तांबे व कार्यकर्ते, तळवलीचे बाबू डावल, अंजनवेल भोईवाडीचे प्रकाश केंबळे आणि कार्यकर्ते यांचे आमदार जाधव यांनी पक्षात स्वागत केले.
‘अच्छे दिन’ आणणार अशा भूलथापा मारुन केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारमधील अनेक मंत्र्यांवर घोटाळ्यांचे आरोप होत आहेत. शिवसेना पक्ष भाजप सोबत फरफटत चालला आहे. त्यामुळे सामान्य जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. म्हणून सूज्ञ जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सानिध्यात येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांनी चिपळुणात केलेल्या पक्षप्रवेशापेक्षा आजचा पक्षप्रवेश मोठा असल्याचा दावा यावेळी जाधव यांनी यावेळी बोलताना केला.
यावेळी पक्षाचे नूतन पदाधिकारी तालुकाध्यक्ष विनायक मुळे, महिला तालुकाध्यक्षा नेत्रा ठाकूर, विधानसभा क्षेत्राध्यक्ष उमेश काटकर, युवक अध्यक्ष मंगेश जोशी, शहराध्यक्ष संतोष वरंडे - गुहागर, सुनील पवार - शृंगारतळी, चिपळूण अर्बन बँक संचालक धनंजय खातू, खरेदी - विक्री संघ संचालक प्रभाकर शिर्के , गणपत पाडावे, वैभव आदवडे, सुवर्णा भोसले, जिल्हा सदस्य दत्ताराम निकम, सुप्रिया साळवी, विद्यार्थी संघटनेचे समीर घाणेकर, नगर परिषद बांधकाम सभापती प्रवीण रहाटे, आरोग्य सभापती नरेश पवार, महिला बालकल्याण सभापती सुजाता बागकर, निधी सुर्वे, स्वीकृ त नगरसेवक मयुरेश कचरेकर, प्रांतीक सदस्य प्रकाश लाड, सुभाष मोहिते, युवक जिल्हाध्यक्ष राजेश आंब्रे, विद्यार्थी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विक्रांत जाधव, मानसिंग महाडिक, रवींद्र सुर्वे, पदाधिकारी तसेच कबड्डी पंच परीक्षेतील यशस्वी पंचांचा जाधव यांच्याहस्ते या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
यावेळी सभापती राजेश बेंडल, उपसभापती सुरेश सावंत, नगराध्यक्ष जयदेव मोरे, उपनगराध्यक्षा स्नेहा वरंडे, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य उपस्थित होेते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष वरंडे यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Bhaskar Jadhav will be in office for the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.