भास्कर जाधवांकडून डच्चू; सुनील तटकरेंकडून स्वागत
By Admin | Updated: July 22, 2014 22:49 IST2014-07-22T22:46:15+5:302014-07-22T22:49:02+5:30
जाधव-तटकरे यांच्यातील वाद पुन्हा उफाळून येण्याची चिन्ह

भास्कर जाधवांकडून डच्चू; सुनील तटकरेंकडून स्वागत
खाडीपट्टा : राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी प्रदेश कार्यकारिणीतून वगळलेल्या खेडच्या बाबाजी जाधव यांना नूतन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पुन्हा कार्यकारिणीत घेतल्याने जाधव-तटकरे यांच्यातील वाद पुन्हा उफाळून येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
भास्कर जाधव यांनी प्रदेशाध्यक्ष असताना कार्यकारिणीच्या रचनेत खेडच्या बाबाजी जाधव यांना वगळले होते. त्यावरुन कार्यकर्ते व भास्कर समर्थकांमध्ये धुमश्चक्री सुरु झाली होती. आता सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर बाबाजी जाधव यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करुन तटकरे यांनी भास्कर जाधव यांच्या गटाला शह दिला आहे.
तटकरे - जाधव यांच्यातील वाद मिटल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर तटकरे यांच्या प्रचारार्थ जाधव यांनी गुहागर मतदारसंघात सभाही घेतल्या होत्या. गुहागर मतदारसंघातून आघाडीला केवळ दोन हजार मताधिक्य मिळाले. प्रदेशाध्यक्षांच्या मतदारसंघात एवढे कमी मताधिक्य का मिळाले, याची चर्चा आता रंगू लागली आहे. (वार्ताहर)