सावधान, फेस्टिवल ऑफर्सच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:34 IST2021-09-18T04:34:52+5:302021-09-18T04:34:52+5:30
तन्मय दाते रत्नागिरी : कोणताही उत्सव आला की, ऑनलाइन नवनवीन ऑफर्स यायला सुरुवात होते. कमी किमतीमध्ये वस्तू मिळत असल्याच्या ...

सावधान, फेस्टिवल ऑफर्सच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक!
तन्मय दाते
रत्नागिरी : कोणताही उत्सव आला की, ऑनलाइन नवनवीन ऑफर्स यायला सुरुवात होते. कमी किमतीमध्ये वस्तू मिळत असल्याच्या आमिषाला अनेकजण बळी पडतात आणि मग फसवणूक हाेते. जिल्ह्यात अशा आमिषाला बळी पडून गेल्या आठ महिन्यांत १९ जणांची फसवणूक झाल्याचे समाेर आले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात स्टॉक क्लिअरच्या नावाने सोशल मीडियावर अल्प किमतीत आकर्षक वस्तू देण्याचे आमिष दाखवले जाते. त्यावर विश्वास ठेवून अनेकजण खरेदी करतात. पण ही खरेदी खात्रीच्या वेबसाईटवरून केली आहे याची कोणी तपासणी करत नाही व पैसे पाठवून झाले की लिंक गायब होते.
खरेदी करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. व्यापार करणारा कोणीही तोट्यात जाऊन काहीच विकत नाही,हे सूत्र ग्राहक म्हणून फिट असणे महत्त्वाचे आहे हे वारंवार पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तरीही अनेकजण अशा आमिषाला बळी पडतात. नागरिकांनी कोणत्याही बळींना पडू नका, ऑनलाईन खरेदी करताना सावधगिरी बाळगणे हे आवश्यक आहे.
अशी होती फसवणूक
ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. ऑफर्सचे शेवटचे चार दिवस किंवा काही तास शिल्लक राहिले आहेत असे मेसेज मोबाईलवर येतात व त्याला अनेकजण भुलतात. कोणती खात्री न करता वस्तूवर क्लिक केले जाते. त्याच वेळी खात्यातून पैसे कट होतात, पण वस्तू काही मिळत नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे कळते व कोणत्याही प्रकाराची ऑनलाइन खरेदी करताना काळजी घेणे महत्त्वाचे.
ही घ्या काळजी
१) ऑनलाईन खरेदी करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक .
२) आवडलेली वस्तू ऑर्डर करताना सीओडी अर्थात कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडणे.
३) अनोळखी ठिकाणाहून खरेदी करताना केवळ स्वस्त मिळतंय म्हणून एकदम खरेदी करू नये.
४) एखादी वस्तू आवडलेली असेल तर विश्वासार्ह अॅपवरून घेण्याचा प्रयत्न करा.
५)खरेदी करण्यापूर्वी साईटची माहिती बघणे व साईटला रेटिंग किती मिळाले आहेत याची खात्री करणे.
सावधानता बाळगून खरेदी करावी
ऑनलाईन खरेदी खात्रीशीर वेबसाईटवरूनच करावी. कोणत्याही साईटवरून मेसेज आला तर तो खात्रीशीर असेल तरच खरेदी करावी. अनोळखी कॉल आला आणि त्याने बँकतून बोलतो असे सांगितले, ओटीपी मागितला तर तो देऊ नये.
- डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी.
आकडेवारी
जानेवारी- ०५
फेबुवारी - ०३
मार्च - ०१
एप्रिल - ०२
मे - ०२
जून - ०२
जुलै - ०१
ऑगस्ट - ०३